‘वास्तव’मधील अभिनेते सुनील शेंडे काळाच्या पडद्याआड
ज्येष्ठ अभिनेते सुनील शेंडे यांचं निधन; राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास
मुंबई- ज्येष्ठ अभिनेते सुनील शेंडे यांचं आज (सोमवार) अल्पशा आजाराने निधन झालं. मुंबईतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी ज्योती, ऋषिकेश आणि ओमकार ही दोन मुलं, सुना आणि नातवंडं असा परिवार आहे. गांधी, सरफरोश, वास्तव यांसारख्या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या होत्या. या चित्रपटांमध्ये ते सहाय्यक भूमिकांमध्ये दिसले होते.
सुनील शेंडे यांची अंत्ययात्रा विले पार्ले इथल्या राहत्या घरातून दुपारी 1 वाजता निघणार आहे. अंधेरीतील पारशी वाडा स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. मधुचंद्राची रात्र, जसा बाप तशी पोरं, ईश्वर, नरसिम्हा, निवडुंग यांसारख्या चित्रपटांमध्येही त्यांनी भूमिका साकारल्या आहेत. मराठीसोबतच हिंदीतही त्यांनी आपल्या दमदार अभिनयाची छाप सोडली होती.
हे सुद्धा वाचा