जॉन अब्राहमने अनेक अभिनेत्यांवर लावले मृत्यू विकल्याचे आरोप? धक्कादायक कारण समोर

Vedaa Star John Abraham: 'सर्व अभिनेते माझे मित्र, पण मी कधीच मृत्यू विकणार नाही...', जॉन अब्राहम याचं मोठं वक्तव्य, असं का म्हणाला अभिनेता?, सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त जॉन अब्राहम याच्या वक्तव्याची चर्चा...

जॉन अब्राहमने अनेक अभिनेत्यांवर लावले मृत्यू विकल्याचे आरोप? धक्कादायक कारण समोर
Follow us
| Updated on: Aug 10, 2024 | 9:30 AM

अभिनेता जॉन अब्राहम सध्या बहुप्रतीक्षित ‘वेदा’ सिनेमामुळे चर्चेत आहे. सध्या अभिनेता सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. सिनेमाच्या प्रचारादरम्यान जॉन अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर देखील बोलताना दिसत आहे. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत, जॉनने पान मसाल्याची जाहिरात करणाऱ्या अभिनेत्यांबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. जॉन अब्राहम निरोगी जीवनशैली जगण्यावर दृढ विश्वास ठेवतो आणि अनेकदा चाहत्यांना तंदुरुस्त राहण्यासाठी प्रोत्साहित करतो. अशात पान मसालासारख्या वस्तूंची जाहिरात का करावी? असा प्रश्न उपस्थित करत अभिनेत्याने तंदुरुस्तीबद्दल जागरूक असण्यासोबतच मृत्यूला विकणाऱ्या अभिनेत्यांवर टीका केली.

नुकताच झालेल्या मुलाखतीत जॉन म्हणाला, ‘मी प्रामाणिकपणे माझं आयुष्य जगत आहे. जर मी चांगल्या गोष्टींचं पालन करत असेल तर, मी एका रोल मॉडेल आहे. पण जर मी लोकांसमोर खोट्या गोष्टी मांडत असेल आणि त्यापाठी एक वेगळं व्यक्तीमत्व असेल तर लोकं ओळखतील…’

पुढे अभिनेता म्हणाला, ‘लोकं फिटनेस बद्दल बोलत असतात आणि तिचं लोकं पान मसाल्याची जाहिरात करतात. मी माझ्या सर्व अभिनेता मित्रांवर प्रेम करतो. याठिकाणी मला कोणाचा अपमान करायचा नाही. मी माझ्याबद्दल बोलत आहे, हे मी स्पष्ट करतो. पण मी कधीच मृत्यू विकणार नाही. कारण ती तत्त्वाची बाब आहे.’

पुढे जॉनने विचारलं ही, ‘पान मसाला उद्योगाची वार्षिक उलाढाल 45000 कोटी रुपये आहे हे तुला माहीत आहे का? याचा अर्थ सरकारही त्याला पाठीशी घालत आहे आणि त्यामुळे ते बेकायदेशीर नाही. सध्या सर्वत्र अभिनेत्याची चर्चा रंगली आहे.

सांगायचं झालं तर, अनेक सेलिब्रिटींनी पान मसाल्याची जाहिरात केली आहे. ज्यामुळे अभिनेते वादाच्या भोवऱ्यात देखील अडकले. शाहरुख खान, अजय देवगन आणि अक्षय कुमार यांसारख्या अनेक अभिनेत्यांनी जाहिरातींद्वारे ब्रँडला दुजोरा दिला. ज्यामुळे अभिनेत्याने टीकेचा समाना देखील करावा लागला.

अभिनेता जॉन अब्राहम याचे सिनेमे

अभिनेता जॉन अब्राहम याच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेता 15 ऑगस्ट रोजी ‘वेदा’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमात जॉन याच्यासोबत अभिनेत्री शर्वरी वाघ मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ‘वेदा’ सिनेमा शिवाय अभिनेता ‘द डिप्लोमॅट’, ‘तारिक’ आणि ‘तेहरान’ सिनेमांमध्ये देखील मुख्य भूमिकेत झळकरणार आहे.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.