Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सारा सोबत रिलेशनशिपमध्ये होता माजी मुख्यमंत्र्यांचा नातू, नातं कबूल करत म्हणाला…

Sara Ali Khan Personal Life: माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलासोबत अनेक वर्ष रिलेशनशिपमध्ये होती सारा अली खान, अनेक वर्षांनंतर नात्याची कबूली देत 'तो' म्हणाला..., अभिनेत्री कायम तिच्या खासगी आयुष्यामुळेचर्चेत असते.

सारा सोबत रिलेशनशिपमध्ये होता माजी मुख्यमंत्र्यांचा नातू, नातं कबूल करत म्हणाला...
Follow us
| Updated on: Jan 31, 2025 | 9:13 AM

Sara Ali Khan Personal Life: अभिनेत्री सारा अली खान गेल्या काही दिवसांपासून तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. सोशल मीडियावर देखील साराचे अनेक फोटो आणि व्हिडीओ तुफान व्हायरल होत असतात. दरम्यान, साराच्या एक्स बॉयफ्रेंडने सारा सोबत असलेल्या नात्यावर मोठं वक्तव्य केलं आहे. सारा एक्स बॉयफ्रेंड दुसरा तिसरा कोणी नाही तर, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू वीर पहाडिया आहे.

सांगायचं झालं तर, वीर सध्या ‘स्काय फोर्स’ सिनेमामुळे चर्चेत आहे. सिनेमा बॉक्स ऑफिसवर देखील चांगली कमाई करताना दिसत आहे. सिनेमा यशाच्या मार्गावर असताना वीर पहाडिया याने त्याच्या खासगी आयुष्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. वीर आणि सारा यांच्या नात्याबद्दल फार कोणाला माहिती नाही. 2018 च्या आधी दोघे एकमेकांना डेट करत होते.

वीर याच्यासोबत असलेल्या नात्यावर ‘कॉफी विथ करण’ मध्ये साराने खुलासा केला होता. या एपिसोडमध्ये सारा हिच्यासोबत अभिनेत्री जान्हवी कपूर देखील होती. दरम्यान, नुकताच झालेल्या एका मुलाखतीत वीर याने सारा सोबत असलेल्या नात्यावर मोठं वक्तव्य केलं आहे.

वीर म्हणाला, ‘एपिसोड प्रदर्शित होत नाही तोपर्यंत मला याबद्दल कोणतीच कल्पना नव्हती. मला माहिती नव्हतं काय शुट झालं आहे. जेव्हा मला कळलं मी हैराण झालो. कारण प्लॅटफॉर्म मोठा आहे. मी तेव्हा सहाय्यक दिग्दर्शक होतो. त्यामुळे कोणी जास्त ओळखू नये, असं मला वाटत होतं. पण त्या एपिसोडनंतर लोकं मला ओळखू लागली.’ असं अभिनेता म्हणाला.

आता कोणाला डेट करतेय सारा अली खान?

गेल्या काही दिवसांपासून सारा अली खान एका भाजप नेत्याच्या मुलाला डेट करत असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. पण यावर साराने अधिकृत घोषणा केलेली नाही. सारा हिच्यासोबत दिसणाऱ्या व्यक्तीचं पूर्ण नाव अर्जुन प्रताप बाजवा आहे.

अर्जुन अभिनेता आणि मॉडेल आहे. अर्जुन हा भाजप नेते फतेह जंग सिंग बाजवा यांचा मुलगा आहे. फतेह जंगसिंग बाजवा हे पंजाबमधील भारतीय जनता पक्षाचे (भाजप) उपाध्यक्ष आहेत. यापूर्वी ते काँग्रेसचे आमदारही राहिले आहेत.

माणिकराव कोकाटेंना न्यायालयाकडूनदिलासा, धाकधूक कायम; प्रकरण नेमकं काय?
माणिकराव कोकाटेंना न्यायालयाकडूनदिलासा, धाकधूक कायम; प्रकरण नेमकं काय?.
'अन्यथा... बात निकलेगी तो फिर दूर तलक जाएगी', अंधारे गोऱ्हेंवर भडकल्या
'अन्यथा... बात निकलेगी तो फिर दूर तलक जाएगी', अंधारे गोऱ्हेंवर भडकल्या.
'12 मर्सिडीज कुठून आणल्या? गोऱ्हे नमकहराम..', ठाकरेंच्या नेत्याची टीका
'12 मर्सिडीज कुठून आणल्या? गोऱ्हे नमकहराम..', ठाकरेंच्या नेत्याची टीका.
'ठाकरे अंतर्वस्त्राचे पैसेही स्वतः देत नाही...', राणेंची जळजळीत टीका
'ठाकरे अंतर्वस्त्राचे पैसेही स्वतः देत नाही...', राणेंची जळजळीत टीका.
भगवी साडी, गळ्यात रुद्राक्ष माळ, पंकजा मुंडेंचं कुंभमेळ्यात शाहीस्नान
भगवी साडी, गळ्यात रुद्राक्ष माळ, पंकजा मुंडेंचं कुंभमेळ्यात शाहीस्नान.
गोऱ्हेंवर अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार, ठाकरे गट त्या आरोपांनंतर आक्रमक
गोऱ्हेंवर अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार, ठाकरे गट त्या आरोपांनंतर आक्रमक.
मुंबई-नाशिक महामार्गावरून प्रवास करतात? पुढील 6 दिवस कसारा घाट बंद
मुंबई-नाशिक महामार्गावरून प्रवास करतात? पुढील 6 दिवस कसारा घाट बंद.
'गोऱ्हे निर्लज्ज बाई, पक्षातून चारदा आमदार पण जाताना घाण..',राऊत भडकले
'गोऱ्हे निर्लज्ज बाई, पक्षातून चारदा आमदार पण जाताना घाण..',राऊत भडकले.
गोऱ्हे ताईंना तिकीसाठी मी इतके पैसे.., ठाकरेंच्या नेत्याचा मोठा खुलासा
गोऱ्हे ताईंना तिकीसाठी मी इतके पैसे.., ठाकरेंच्या नेत्याचा मोठा खुलासा.
ताठ होती माना..., शिवरायांच्या 12 किल्ल्यांना 'वर्ल्ड हेरिटेज' नामांकन
ताठ होती माना..., शिवरायांच्या 12 किल्ल्यांना 'वर्ल्ड हेरिटेज' नामांकन.