सलमान खानच्या घरावर गोळीबार केलेल्या रात्री हल्लेखोर रात्रभर मुंबईच्या ‘या’ भागात, खळबळजनक खुलासा आणि..
अभिनेता सलमान खान याच्या घरावर गोळीबार रविवारी पहाटे करण्यात आला. दोन हल्लेखोर दुचाकीने येत त्यांनी सलमानच्या घरावर गोळीबार केला. या घटनेनंतर मोठी खळबळ बघायला मिळाली. हेच नाही तर गोळीबाराची संपूर्ण घटना ही कॅमेऱ्यात कैद झाला, ज्याचा सीसीटीव्ही व्हिडीओ व्हायरल होताना दिसला.
बाॅलिवूड अभिनेता सलमान खान याच्या घरावर गोळीबार करण्यात आल्याची हैराण करणारी घटना घडलीये. या गोळीबारानंतर एक नाव तूफान चर्चेत आले ते म्हणजे लॉरेन्स बिश्नोई याचे. लॉरेन्स बिश्नोई हा गेल्या काही वर्षांपासून सतत सलमान खान याला जीवे मारण्याच्या धमक्या देताना दिसतोय. हेच नाही तर सलमान खान याला जीवे मारणेच आपले ध्येय असल्याचे थेट लॉरेन्स बिश्नोई याने काही दिवसांपूर्वीच दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले. सलमान खान याच्या घरावर झालेल्या गोळीबाराची जबाबदारी ही लॉरेन्स बिश्नोई याचा भाऊ अनमोल बिश्नोई याने घेतली. तशी पोस्टही सोशल मीडियावर शेअर करण्यात आलीये.
सलमान खानच्या घरावरील गोळीबारानंतर मुंबई पोलिसांनी अवघ्या काही तासांमध्येच आरोपींच्या मुसक्या आवळल्या. गुजरातमधील भुज येथून हल्लेखोरांना ताब्यात घेतले. हे हल्लेखोर गेल्या काही दिवसांपासून सलमान खान याच्या घराची रेकी करत असल्याचे देखील पुढे आले. हेच नाही तर पनवेल येथे किरायाने यांनी एक फ्लॅट देखील घेतल्याचे पुढे येतंय.
नुकताच एक हैराण करणारी माहिती पुढे आलीये. सलमान खान याच्या घरावर गोळीबार करण्याच्या रात्री हे दोन्ही हल्लेखोर रात्रभर बांद्रा बँडस्टॅंड परिसरात फिरत होते. कोणाच्याही नजरी पडू नये, म्हणून हे आरोपी सतत फिरत होते. विशेष म्हणजे यावेळी या हल्लेखोरांकडे दुचाकी देखील होती. गोळीबाराची सर्व प्लॅनिंग अगोदरच ठरली होती.
हेच नाही तर धक्कादायक म्हणजे या दोन्ही आरोपींच्या संपर्कात अनमोल बिश्नोई हा होता. आरोपींना बंदुक नेमकी कोणी पुरवली, याचा शोध पोलिसांकडून घेतला जातोय. गोळीबार केल्यानंतर आरोपी मुंबईच्या बाहेर पळून गेले. या दोन्ही आरोपींना मुंबईच्या रस्त्यांची फार काही माहिती नसल्याचे देखील पुढे येतंय. हे आरोपी सतत लोकांना रस्त्यांबद्दल माहिती विचारत होते. काही दिवसांपूर्वीच सलमान खान याला मेल करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली.
सततच्या धमक्यांमुळे अगोदर मुंबई पोलिसांकडून सलमान खान याच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली. मुंबई पोलिसांनी सलमान खान याला अतिरिक्त सुरक्षा पुरवली आहे. सलमान खान याला भेटण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याच्या घरी पोहचले होते, ज्याचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले. या फोटोंमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सलमान खान आणि त्याचे वडील सलिम खान आणि अजून काही लोक दिसत आहेत.