Vikram Gokhale: ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले तब्येत खालावल्याने रुग्णालयात दाखल

विक्रम गोखले यांच्यावर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू; चाहत्यांकडून काळजी व्यक्त

Vikram Gokhale: ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले तब्येत खालावल्याने रुग्णालयात दाखल
Vikram GokhaleImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Nov 23, 2022 | 3:15 PM

पुणे: ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या तब्येतीविषयीची महत्त्वपूर्ण माहिती समोर येत आहे. विक्रम गोखले यांच्यावर पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गेल्या 15 दिवसांपासून ते रुग्णालयात दाखल आहेत. मात्र आता त्यांची तब्येत खालावल्याचं कळतंय.

विक्रम गोखले हे रंगभूमी, टेलिव्हिजन आणि चित्रपट अशा सर्व व्यासपीठांवरील अत्यंत नावाजलेले कलाकार आहेत. रंगभूमीवर त्यांनी एक मोठा काळ गाजवला आहे. मराठीसोबतच त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतही नाव कमावलंय. सध्या ते स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेत भूमिका साकारत आहेत. काही वर्षांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आलेली लोकप्रिय मालिका ‘अग्निहोत्र’मध्ये त्यांनी साकारलेली मोरेश्वर अग्निहोत्री ही भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे.

अभिनयासोबतच विक्रम गोखलेंनी लेखन आणि दिग्दर्शन क्षेत्रातही काम केलं आहे. 2010 मध्ये त्यांनी ‘आघात’ या चित्रपटातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं. या चित्रपटाचं समिक्षकांनी विशेष कौतुक केलं होतं. 2013 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या ‘अनुमती’ या चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आलं होतं.

हे सुद्धा वाचा

गेल्या काही काळापासून घशाच्या त्रासामुळे त्यांनी नाटकातून संन्यास घेतला आहे. सध्या ते नवोदित कलावंतांना अभिनयाचं प्रशिक्षण देण्याचंही काम करत आहेत. विक्रम गोखले यांची महत्त्वपूर्ण भूमिका असलेला ‘गोदावरी’ हा चित्रपट याच महिन्यात प्रदर्शित झाला. या चित्रपटात त्यांनी जितेंद्र जोश, नीना कुळकर्णी, संजय मोने, गौरी नलावडे यांच्यासोबत काम केलं. या चित्रपटाच्या शूटिंगच्या आधीही ते रुग्णालयात दाखल होते. डिस्चार्ज मिळताच त्यांनी शूटिंगला सुरुवात केली होती.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.