Video : 75 वर्षीय मुमताज यांचा वर्कआऊट व्हिडीओ पाहून थक्क; नेटकरी म्हणाले ‘माशाल्लाह’!

बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री मुमताज या स्वभावाने अत्यंत शांत होत्या. जवळच्यांना भरपूर प्रेम देणं ही त्यांची खरी ओळख होती. मुमताज आता 75 वर्षांच्या आहेत. पण या वयातही त्या स्वत:ला फिट ठेवण्यासाठी जिममध्ये कसून वर्कआऊट करतात.

Video : 75 वर्षीय मुमताज यांचा वर्कआऊट व्हिडीओ पाहून थक्क; नेटकरी म्हणाले 'माशाल्लाह'!
MumtazImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Mar 02, 2023 | 11:57 AM

मुंबई : 70 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री मुमताज या त्यांच्या दमदार अभिनयासाठी आणि सौंदर्यासाठी ओळखल्या जातात. आजसुद्धा मुमताज यांना पाहून चाहत्यांच्या हृदयाचा ठोका चुकतो. मुमताज आता 75 वर्षांच्या आहेत. पण या वयातही त्या स्वत:ला फिट ठेवण्यासाठी जिममध्ये कसून वर्कआऊट करतात. त्यांचं फिटनेस पाहून तुम्हीसुद्धा थक्क व्हाल. मुमताज या त्यांच्या फिटनेसविषयी खूप सजग असतात आणि नेहमीच त्या चाहत्यांनाही त्यासाठी प्रेरणा देतात. वयाच्या 75 वर्षी त्या जिममध्ये ज्या पद्धतीने वर्कआऊट करत आहेत, ते पाहून भल्याभल्यांना आश्चर्य वाटेल. सोशल मीडियावर सध्या त्यांचा हा व्हिडीओ व्हायरल होतोय.

वयाच्या 75 व्या वर्षी हेवी-वेट वर्कआऊट

सोशल मीडियावरील या व्हिडीओमध्ये मुमताज या हेवी-वेट वर्कआऊट करताना दिसत आहेत. हा व्यायाम तसा सोपा नाही. मात्र त्यांची मेहनत आणि जिद्द पाहून चाहते थक्क झाले आहेत. मुमताज यांच्या व्हिडीओवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय.

हे सुद्धा वाचा

मुमताज यांनी नुकताच इन्स्टाग्रामवर अकाऊंट सुरू केला. या अकाऊंटवर त्यांनी वर्कआऊटचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. फक्त व्यायामच नाही तर त्या डाएटच्या बाबतीतही सजग असतात. त्यांचा हा व्हिडीओ पाहून नेटकरी त्यांचं कौतुक करतायत. अप्रतिम, अशी कमेंट एका युजरने केली. तर ‘माशाल्लाह, कृपया काळजी घ्या’ असं दुसऱ्याने लिहिलं आहे.

हिरामंडी या वेब सीरिजमध्ये मुमताज यांची भूमिका

मुमताज यांनी 1958 मध्ये ‘सोने की चिडिया’ या चित्रपटातून बालकलाकार म्हणून अभिनयाची सुरूवात केली होती. त्या काळात त्या सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्री होत्या. आपल्या तीन दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी एकापेक्षा एक दमदार भूमिका साकारल्या आहेत. 1990 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘आंधियाँ’ या चित्रपटानंतर त्यांनी अभिनय सोडलं. आता पुन्हा एकदा त्या कमबॅक करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. संजय लीला भन्साळी यांच्या ‘हिरामंडी’ या सीरिजमधून त्या पुनरागमन करत आहेत.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.