Sulochana Latkar | ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी यांचे निधन, मुंबईतील रुग्णालयात सुरू होते उपचार
Sulochana Latkar Passed Away ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी यांचे नुकताच मुंबईमध्ये निधन झाले आहे. सुलोचना दीदी यांनी एक मोठा काळ बाॅलिवूडमध्ये गाजवला आहे. फक्त बाॅलिवूडच नाही तर मराठी चित्रपटांमध्येही सुलोचना दीदी यांनी धमाकेदार भूमिका केल्या.
मुंबई : बाॅलिवूड आणि मराठी चित्रपटसृष्टीतील अत्यंत दु:ख बातमी पुढे आलीये. ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी अर्थात सुलोचना लाटकर (Sulochana Latkar) यांचे नुकताच निधन झाले आहे. आपल्या अभिनयाने कोट्यावधी चाहत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या सुलोचना दीदी यांचे मुंबईत निधन झाले आहे. वृद्धापकाळाने निधन झाल्याचे सांगितले जात असून मुंबईतील शुश्रूषा हॉस्पिटलमध्ये (Hospital) त्यांच्यावर उपचार हे सुरू होते. सुलोचना दीदी या 94 वर्षाच्या होत्या. सुलोचना दीदी यांच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसलाय. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या तब्येतीमध्ये चढउतार हा सातत्याने बघायला मिळत होता. एक अत्यंत मोठा काळ त्यांनी बाॅलिवूडमध्ये गाजवला आहे.
व्हेंटिलेटरवर सुरू होते सुलोचना दीदी यांच्यावर उपचार
3 जून रोजी सुलोचना दीदी यांची तब्येत बिघडल्याने त्यांना थेट व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मात्र, व्हेंटिलेटरवर ठेऊनही त्यांच्या तब्येतीमध्ये काही सुधारणा झाली नाही. मार्चपासूनच त्यांना श्वासोच्छवासा समस्या या निर्माण झाल्या होता. त्यावेळी तीन आठवड्यांच्या उपचारानंतर त्यांच्या तब्येतीमध्ये मोठी सुधारणा झाली होती.
सोमवारी मुंबईमध्ये होणार अंतिम संस्कार
सोमवारी मुंबईमध्ये सुलोचना दीदी यांच्यावर अंतिम संस्कार होणार असल्याचे सांगितले जात आहे. सुलोचना दीदी यांच्या निधनानंतर बाॅलिवूड विश्वाला अत्यंत मोठा धक्का बसलाय. अनेक बाॅलिवूड स्टारने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सुलोचना दीदी यांच्या निधनानंतर दु:ख व्यक्त केले आहे. सुप्रिया सुळे यांनी एक पोस्ट शेअर केलीये.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले होते सुलोचना दीदी यांच्या मदतीला धावून
सुलोचना दीदी यांची मार्च महिन्यात तब्येत खराब झाल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुलोचना दीदी यांच्या सर्व उपचाराचा खर्च उचलणार असल्याचे जाहिर केले होते. इतकेच नाही तर तातडीने मुख्यमंत्री सहायता निधीतून 3 लाख रुपयेही देण्यात आले होते.
अनेक चित्रपटांमध्ये सुलोचना दीदी आईच्या भूमिकेत
सुलोचना दीदी यांनी बाॅलिवूड चित्रपटांसह अनेक मराठी चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका या केल्या आहेत. मराठा तितुका मेळावा, मोलकरीण, बाळा जो र, सांगते ऐका, सासुरवास अशा चित्रपटांमध्ये हिट भूमिका केल्या आहेत. अमिताभ बच्चन यांच्यासोबत देखील सुलोचना दीदी यांनी काम केले आहे.
250 हिंदी चित्रपट आणि 50 हून अधिक मराठी चित्रपटांमध्ये केले काम
विशेष म्हणजे सुलोचना दीदी यांनी अनेक चित्रपटांमध्ये आईची भूमिका केली आहे. दिलीप कुमार आणि धर्मेंद्र यांच्यासोबतही सुलोचना दीदी यांनी चित्रपटांमध्ये काम केले आहे. सुलोचना दीदी यांनी कारर्किद अत्यंत मोठी असून त्यांनी आपल्या करिअरमध्ये तब्बल 250 हिंदी चित्रपटांमध्ये आणि 50 हून अधिक मराठी चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत.