प्रसिद्ध अभिनेत्याचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन; वयाच्या 76 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
धक्कादायक... प्रसिद्ध अभिनेत्याच्या निधनानंतर सेलिब्रिटी आणि कुटुंबावर दुःखचा डोंगर... चाहते आणि सेलिब्रिटी यांनी सोशल मीडियाच्या माध्यामातून वाहिली श्रद्धांजली...
मुंबई : मल्याळम चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते मामुकोया (mamukkoya) यांच्याबाबत एक वाईट बातमी येत आहे. मामुकोया यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. त्यांच्या निधनामुळे चाहते आणि कलाविश्वाला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या निधनामुळे कलाविश्वात शोककळा पसरली आहे. वयाच्या ७६ व्या वर्षी मामुकोया यांनी अखेरचा श्वास घेतला. मामुकोया यांनी अचानक जगाचा निरोप घेतल्यामुळे सेलिब्रिटी आणि कुटुंबावर दुःखचा डोंगर कोसळला आहे. मामुकोया यांच्या निधनानंतर चाहते आणि सेलिब्रिटी यांनी सोशल मीडियाच्या माध्यामातून श्रद्धांजली वाहिली आहे. सध्या सर्वत्र मामुकोया यांची चर्चा रंगत आहे.
रिपोर्टनुसार, ज्येष्ठ अभिनेते मामुकोया सेव्हन्स फुटबॉल स्पर्धेच्या उद्घाटनासाठी पोहोचले होते, तेव्हा अचानक मामुकोया यांना अस्वस्थ वाटू लागलं आणि ते जागीच पडले. प्रकृती खालावल्यानंतर त्यांना, तात्काळ कोझिकोड येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण उपचारादरम्यान च्यांचं निधन झालं. मामुकोया यांना रुग्णालयात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं.
फुटबॉलशी संबंधित कार्यक्रमात प्रकृती खालावल्यानंतर त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले, मात्र त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा होत नव्हाती. अखेर बुधवारी मामुकोया यांनी अखेरचा श्वास घेतला. ७६ वर्षीय मामुकोया यांनी ‘फ्लेमेन इम पॅराडीज’ या सिनेमात देखील काम केलं आहे.
मामुकोया यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, मल्याळम सिनेमात पाऊल ठेवण्यापूर्वी मामुकोया कॉमेडी स्टार होते. शिवाय त्यांचं थिएटर क्षेत्रात मोठं योगदान आहे. अशाचप्रकारे मामुकोया यांचा प्रवास सुरु झाला. मामुकोया यांनी तब्बल 450 हून अधिक सिनेमांमध्ये काम केलं आणि दोन राज्य पुरस्कारही जिंकले. मामुकोया यांना ‘पेरुमाझक्कलम’ आणि ‘इन्नाथे चिंता विषयम’ यांसाठी दोन केरळ राज्य पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे.
Halal Love Story, Kuruthi आणि Minnal Murali यांसारख्या सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत मामुकोया यांनी चाहत्यांचं मनोरंजन केलं. गेल्या वर्षी मामुकोया कोब्रा या सिनेमात देखील झळकले होते. ज्यामध्ये त्यांनी साऊथचा सुपरस्टार विक्रमसोबत काम केलं होतं. कोब्रा या सिनेमाला संगीत ए आर रहमान यांनी दिलं.