Anupama Actress Madhavi Gogate Death | ज्येष्ठ अभिनेत्री माधवी गोगटे यांचे निधन

माधवी गोगटे यांनी मराठी चित्रपटांसोबतच अनेक मराठी आणि हिंदी मालिकांमध्येही काम केले आहे. त्यांच्या प्रत्येक भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या आहेत. 'भ्रमाचा भोपळा' आणि 'गेला माधव कुणीकडे' ही त्यांची नाटकेही फार गाजली.

Anupama Actress Madhavi Gogate Death | ज्येष्ठ अभिनेत्री माधवी गोगटे यांचे निधन
जेष्ठ अभिनेत्री माधवी गोगटे यांचे निधन
Follow us
| Updated on: Nov 22, 2021 | 10:45 AM

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाने छाप सोडणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री माधवी गोगटे (Madhavi Gogate) यांचे आज निधन झाले. त्या 58 वर्षाच्या होत्या. मुंबईतील सेव्हन हिल रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांना कोरोनाचे निदान झाल्याचे कळते. सेव्हन हिल रुग्णालयात उपचारा दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पती आणि विवाहित मुलगी आहे. माधवी यांच्या निधनामुळे मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

अनेक हिंदी आणि मराठी मालिकेत भूमिका केल्या

माधवी गोगटे यांनी मराठी चित्रपटांसोबतच अनेक मराठी आणि हिंदी मालिकांमध्येही काम केले आहे. त्यांच्या प्रत्येक भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या आहेत. ‘भ्रमाचा भोपळा’ आणि ‘गेला माधव कुणीकडे’ ही त्यांची नाटकेही फार गाजली. माधवी यांनी जेष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्यासोबतही ‘घनचक्कर’ चित्रपटात स्क्रीन शेअर केली आहे. ‘मिसेस तेंडुलकर’, ‘कोई अपना सा’, ‘ऐसा कभी सोचा न था’, ‘एक सफर’, ‘बसेरा’, ‘बाबा ऐसो वर ढुंडो’, ‘ढुंड लेंगी मंजिल हमें’, ‘कहीं तो होगा’ या हिंदी मालिकांमध्येही त्यांनी भूमिका केल्या आहेत. ‘तुझं माझं जमतंय’ या मराठी मालिकेतही त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती.

रंगभूमीवरुन अभिनय कारकिर्दीला सुरुवात

माधवी गोगटे यांनी रंगभूमीवरुन आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी चित्रपटसृष्टीत पाऊल टाकले. ‘घनचक्कर’ चित्रपटातील त्यांची भूमिका विशेष गाजली. याच चित्रपटाने त्यांना ओळख मिळवून दिली. त्यानंतर ‘सत्वपरीक्षा’ या चित्रपटातही त्यांनी काम केले. सूत्रधार चित्रपटाद्वारे त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. त्यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. (Veteran Marathi film actress Madhavi Gogte passes away)

इतर बातम्या

Devmanus 2 | तो परत येतोय, ‘देवमाणूस 2’ मालिकेचा उत्कंठावर्धक प्रोमो, डॉ. अजितकुमार पुन्हा भेटीला

अमिताभ बच्चन यांनी पान मसाला ‘कमला पसंद’ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नेमके प्रकरण काय?

मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.