संसार पणाला लावूनही अंकिताचं स्वप्न अपूर्णच; पती विकीचे डोळे पाणावले

'बिग बॉस 17'मध्ये टॉप 4 मध्ये जागा मिळवल्यानंतर अभिनेत्री अंकिता लोखंडेचा प्रवास संपला. विजेतेपदाच्या अगदी जवळ गेल्यानंतर अंकिताच्या हाती अपयश आलं. तिच्या एलिमिनेशननंतर सूत्रसंचालक सलमान खाननेही आश्चर्य व्यक्त केला. तर पती विकी जैनचे डोळे पाणावले.

संसार पणाला लावूनही अंकिताचं स्वप्न अपूर्णच; पती विकीचे डोळे पाणावले
अंकिता बाद होताच पती विकीचे डोळे पाणावलेImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Jan 29, 2024 | 12:25 AM

मुंबई : 28 जानेवारी 2024 | ज्या गोष्टीसाठी अभिनेत्री अंकिता लोखंडेनं अट्टहास केला होता, ती गोष्ट मिळवण्यात अखेर तिला अपयश आलं. ‘बिग बॉस 17’मधील अंकिताचा प्रवास संपुष्टात आला. ग्रँड फिनालेमध्ये अंकितासह मुनव्वर फारुकी, अभिषेक कुमार, मन्नारा चोप्रा आणि अरुण माशेट्टी हे चार जण पोहोचले होते. त्यापैकी सर्वांत आधी अरुणला घराबाहेर पडावं लागलं होतं. टॉप 4 मध्ये जागा मिळवल्यानंतर अंकिताचा बिग बॉसमधील प्रवास संपल्याचं सूत्रसंचालक सलमान खानने जाहीर केलं. हे ऐकून अंकितासह सर्वांनाच मोठा धक्का बसला. कारण ती विजेती ठरणार, असा अंदाज अनेकांनी व्यक्त केला होता. यावेळी अंकिताचा पती विकी जैनचे डोळे पाण्यावल्याचं पहायला मिळालं.

बिग बॉसच्या घराबाहेर आल्यानंतर अंकिता जेव्हा स्टेजवर पोहोचली, तेव्हा सलमाननेही तिच्या एलिमिनेशनवर आश्चर्य व्यक्त केला. “मी चकीत झालोय. मला वाटलं की तू विजेती ठरशील. तू विजेती नाहीस ते पाहून मलाही खूप मोठा धक्का बसला आहे. नेमकं काय झालं, हे मलाही समजलं नाही. संपूर्ण टीमला धक्का बसला आहे. गेल्या वर्षी मला वाटलं होतं की प्रियांका चहर चौधरी विजेती ठरेल. यावर्षी मला तुझ्यावर विश्वास होता. आतापर्यंत बिग बॉसचे जितके सिझन्स झाले, त्यापैकी तुझा प्रवास हा सर्वांत कठीण होता”, असं सलमान म्हणाला.

हे सुद्धा वाचा

सलमानचे हे शब्द ऐकून अंकिताही नि:शब्द झाली होती. मात्र आई सोबत असल्याने मी खुश आहे, अशा शब्दांत तिने भावना व्यक्त केल्या. “जर मी आणखी लवकर बाहेर पडले असते तर खूप मोठी समस्या झाली असती असं मला वाटतं. पण आई आता इथे सोबत असल्याने मी खुश आहे”, असं ती म्हणाली.

ऑक्टोबर महिन्यात अंकिता आणि तिचा पती विकी जैन हे दोघं ‘बिग बॉस 17’मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाले. बिग बॉसच्या पहिल्या दिवसापासून या दोघांच्या नात्याची वेगळी बाजू प्रेक्षकांना पहायला मिळाली. अंकिता आणि विकी यांच्यात सतत भांडणं झाली. त्यानंतर जेव्हा विकीची आई रंजना जैन बिग बॉसच्या घरात आल्या, तेव्हा सासू-सुनेतील वेगळं समीकरण प्रेक्षकांना पहायला मिळालं. इतकंच नव्हे तर बिग बॉसनंतर अंकिता आणि विकी विभक्त होणार की काय, असा प्रश्न चाहत्यांना पडला होता.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.