Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘आपला पती, आपलं संसार हे सगळं विसरून ती..’; अंकिता लोखंडेच्या सासूने सुनावलं

बिग बॉसच्या घरात फॅमिली वीकदरम्यान अंकिता लोखंडेची आई वंदना लोखंडे आणि विकी जैनची आई रंजना जैन या त्यांची भेट घेण्यासाठी आल्या होत्या. या भेटीनंतर दिलेल्या एका मुलाखतीत अंकिताच्या सासुने तिला खूप सुनावलं आहे. विकीवर हात उचलणं, त्याच्यावर उशी फेकणं हे सर्व ठीक नसल्याचं त्या म्हणाल्या आहेत.

'आपला पती, आपलं संसार हे सगळं विसरून ती..'; अंकिता लोखंडेच्या सासूने सुनावलं
अंकिता लोखंडे आणि तिची सासू रंजना जैनImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jan 10, 2024 | 10:01 AM

मुंबई : 10 जानेवारी 2024 | टेलिव्हिजनवरील सर्वांत लोकप्रिय रिॲलिटी शो ‘बिग बॉस 17’ आता अंतिम टप्प्यात पोहोचत आहे. काही दिवसांतच या शोमधील स्पर्धकांचा प्रवास संपुष्टात येणार आहे. प्रत्येक सिझनप्रमाणेच यंदाही अखेरच्या टप्प्यात स्पर्धकांचा धीर वाढवण्यासाठी त्यांचे कुटुंबीय त्यांना भेटण्यासाठी बिग बॉसच्या घरात येतात. बिग बॉसच्या फॅमिली वीकअंतर्गत स्पर्धकांचे कुटुंबीय त्यांच्या भेटीला येत आहेत. सर्वांत आधी अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांची आई आली. मालिकेच्या प्रोमोमध्ये विकी जैनची आई सर्व स्पर्धकांशी मजा-मस्ती करताना दिसत आहेत. आता घराबाहेर आल्यानंतर त्यांनी एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत ते सून अंकिता आणि विकीबद्दल व्यक्त झाले आहेत.

बिग बॉसच्या घरात गेल्यानंतर रंजना जैन आधी अंकितावर प्रेमाचा वर्षाव करतात. मात्र नंतर विकीला लाथ मारण्याच्या घटनेवरून तिला सुनावतात. यावरून सासू-सुनेत थोडी बाचाबाची झाल्याचंही पहायला मिळतं. आता बाहेर आल्यानंतर दिलेल्या मुलाखतीत त्यांना विचारण्यात आलं की अंकिता लोखंडेचा खेळ कसा आहे आणि ती एक चांगली सून आहे का? त्यावर उत्तर देताना त्या म्हणाल्या, “ती खूप चांगलं खेळतेय. सून म्हणून ती चांगली आहे पण आता तिचा चांगुलपणा दिसून येत नाहीये. मी घरात गेले तेव्हा तिला समजावलं होतं की आता जितके दिवस शिल्लक राहिले आहेत, त्यात तुझा चांगला स्वभाव सर्वांना दाखवून दे.”

हे सुद्धा वाचा

बिग बॉसच्या घरात अंकिता आणि विकी यांच्यामध्ये दररोज भांडणं होताना दिसतायत. त्यामुळे या भांडणांबद्दल मुलाला आणि सुनेला काही समजावलं का, असं विचारलं असता त्या पुढे म्हणाल्या, “होय, मी विकीला समजावलं आहे. अंकिता तुझ्याकडे तुझा वेळच मागते. तिला वेळ देत जा, असं मी त्याला सांगितलं आहे. मला असं वाटतं की हे दोघं जाणूनबुजून भांडणं करत आहेत. ते म्हणतात की आमची प्रेम करण्याची हीच पद्धत आहे. तुम्हाला कदाचित ते भांडण वाटत असेल.”

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

या मुलाखतीत त्या अंकिताच्या हात उचलण्यावरही व्यक्त झाल्या. “हे अत्यंत चुकीचं होतं. कारण आपल्या देशात पतीला देव मानलं जातं. तो तुझा खरंच देवता पती आहे आणि तू त्याच्यावरच हात कसा उचलू शकतेस”, असा सवाल त्यांनी केला. इतकंच नव्हे तर बिग बॉसच्या घरात सतत सुशांत सिंह राजपूतचं नाव घेऊन ती सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करतेय, असंही त्यांनी म्हटलंय.

यावेळी रंजना जैन यांनी सून अंकिताला विशेष सल्लासुद्धा दिला आहे. “अंकिताला हे सांगायचं आहे की तिने तिचे शब्द सुधारावेत आणि पतीचा आदर करायला शिकावं. ती एका कुटुंबात राहतेस, एका मुलाशी तिचं लग्न झालंय, ही गोष्ट तिने विसरू नये. मात्र ती हे सर्व विसरून ती भांडायला सदैव तयार असते”, असं त्या म्हणाल्या.