“बराच पैसा गमावल्यानंतर तिचे नखरे..”; अंकिता लोखंडेच्या सासूचं धक्कादायक वक्तव्य

अंकिता लोखंडेची सासू आणि विकी जैनची आई रंजना जैन यांची एक मुलाखत सध्या चर्चेत आली आहे. अंकिताशी लग्न करणं म्हणजे एक गुंतवणूक आहे, असं विकीने म्हटलं होतं. त्याच्या या वक्तव्यावर आता रंजना यांनी धक्कादायक प्रतिक्रिया दिली आहे.

बराच पैसा गमावल्यानंतर तिचे नखरे..; अंकिता लोखंडेच्या सासूचं धक्कादायक वक्तव्य
अंकिता लोखंडे आणि तिची सासू रंजना जैनImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jan 11, 2024 | 9:51 AM

मुंबई : 11 जानेवारी 2024 | ‘बिग बॉस 17’च्या घरात आणि घराबाहेर सध्या सर्वाधिक चर्चा ही अंकिता लोखंडे आणि विकी जैन या जोडीचीच होत आहे. फॅमिली वीकदरम्यान या दोघांची आई बिग बॉसच्या घरात गेली होती. तिथून बाहेर आल्यानंतर विकीची आई आणि अंकिताची सासू रंजना जैन या विविध मुलाखतींमध्ये मुलाची बाजू घेताना दिसत आहेत. असं करताना त्यांनी अंकिताविषयी काही वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. ज्यामुळे चाहत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. आता विकीच्या आईने मुलाच्या ‘इन्वेस्टमेंट’च्या कमेंटवर प्रतिक्रिया दिली आहे. अंकिताशी लग्न करणं म्हणजे ही एक प्रकारची गुंतवणूकच आहे, असं विकीने बिग बॉसच्या घरात म्हटलं होतं. त्यावरून रंजना जैन यांना प्रश्न विचारण्यात आला.

“तिच्या जागी दुसरी कोणी असती तर..”

मुलाच्या कमेंटवर बोलताना त्या म्हणाल्या, “हिरोईनला मिळवायचं असेल तर मेहनत करावी लागतेच. ती सहजतेने तुमच्याकडे येत नाही. गुंतवणूक तर खूप करावी लागते, तेव्हा जाऊन ती भेटते आणि बराच पैसाही गमवावा लागतो, तेव्हा तिचे नखरे पूर्ण होतात.” विकी हा अंकितामुळेच बिग बॉसमध्ये आल्याचं त्यांनी सांगितलं. तिच्या जागी दुसरी कोणी असती तर हे शक्य झालं नसतं, असंही त्यांनी मान्य केलंय.

“अंकितामुळेच विकी बिग बॉसच्या घरात”

अंकिताबद्दल त्या पुढे म्हणाल्या, “ती खूप चांगली सून आहे आणि तिच्यात ते सर्व गुण आहेत. म्हणूनच मी म्हणते की ती व्यक्ती म्हणून चांगली आहे. आम्ही अंकितासाठीच विकीला बिग बॉसच्या घरात पाठवलं होतं. विकी एकटाच बिग बॉसच्या घरात जाऊ शकला नसता. या शोमध्ये तो अंकितामुळेच आहे. सर्वसामान्य मुलगी विकीचं मन जिंकू शकली नसती. अंकिताने ते करून दाखवलं. दोघांनी याआधी स्मार्ट जोडीचा शोसुद्धा जिंकला होता. आमच्याकडे विकीसाठी बरेच प्रपोजल्स आले होते, पण आम्ही त्या सगळ्यांना नकार दिला होता. जे विकी म्हणेल तेच होईल. त्यामुळे आता त्यानेच पसंत केलंय तर त्यालाच ते नातं सांभाळू द्या.”

हे सुद्धा वाचा

बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर विकी जैनच्या आईने दिलेल्या विविध मुलाखती आता चर्चेत आल्या आहेत. अंकिताशी लग्न करण्याबद्दल आमची परवानगी नव्हती, असंही त्या एका मुलाखतीत म्हणाल्या आहेत. विकीने त्याच्या मर्जीनेच अंकिताशी लग्न केलं, आमचा स्पष्ट नकार होता, असा खुलासा रंजना जैन यांनी केला.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.