अंकिताला ज्या गोष्टीची भीती होती अखेर तेच घडलं; बिग बॉसच्या घरातून बाहेर पडताच विकीने पहा काय केलं?

विकी बिग बॉसच्या घराबाहेर जात असताना अंकिता ढसाढसा रडू लागली होती. तेव्हा तिला हसवण्यासाठी विकी म्हणाला, “आता मी बिग बॉसच्या घराबाहेर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत पार्टी करणार आहे.” त्यावर अंकिता त्याला म्हणते की मला सोडून एकटाच पार्टी करू नकोस.

अंकिताला ज्या गोष्टीची भीती होती अखेर तेच घडलं; बिग बॉसच्या घरातून बाहेर पडताच विकीने पहा काय केलं?
Vicky Jain and Ankita LokhandeImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jan 25, 2024 | 9:07 AM

मुंबई : 25 जानेवारी 2024 | बिग बॉसच्या घरात जवळपास 100 दिवस राहिल्यानंतर अभिनेत्री अंकिता लोखंडेचा पती आणि बिझनेसमन विकी जैन याचा प्रवास नुकताच संपला. ग्रँड फिनालेच्या आधी पार पडलेल्या एलिमिनेशनमध्ये विकीला बिग बॉसच्या घराबाहेर जावं लागलं. बाहेर आल्यानंतर विकीने अद्याप कोणालाही मुलाखत दिलेली नाही. मात्र त्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये तो बिग बॉसमधील मैत्रिणींसोबत दिसून येत आहे. अंकिताला ज्या गोष्टीची भीती होती, तीच गोष्ट विकीने बिग बॉसच्या घराबाहेर पडताच सर्वांत आधी केली आहे. आयेशा खान, ईशा मालवीय आणि सना रईस खान या तिघींसोबत विकीचे फोटो व्हायरल होत आहेत.

अंकिताला विकीला अनेकदा सांगितलं होतं की बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर पार्टी करू नकोस. विकीने सर्वांत आधी नेमकं तेच केलंय. विकी ‘हाऊस पार्टी’चं आयोजन केलं असून त्याच्यासोबत आयेशा, ईशा आणि सना या तिघीजणी दिसून येत आहेत. विकीची बहीण खुशी जैनने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत. यामध्ये ती ईशा आणि सना यांच्यासोबत पोझ देताना दिसतेय. ‘भाई परत आला आहे. विकीच खरा विजेता आहे’, असं कॅप्शन तिने या फोटोला दिलं आहे. बिग बॉसच्या घराबाहेर पडताच पार्टी केल्याने नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत.

हे सुद्धा वाचा

‘अंकिता अजिबात खुश होणार नाही’, असं एकाने लिहिलं. तर ‘विकी फक्त मुलींसोबतच पार्टी करतोय’, असं दुसऱ्याने म्हटलंय. बिग बॉसच्या घरात पार पडलेल्या मिड-विक एव्हिक्शनमध्ये विकीचा प्रवास संपला. तो जवळपास 100 दिवस बिग बॉसच्या घरात राहिला होता. विकीच्या एलिमिनेशननंतर आता बिग बॉसच्या घरात टॉप 5 स्पर्धक राहिले आहेत. मन्नारा चोप्रा, अंकिता लोखंडे, मुनव्वर फारुकी, अरुण माशेट्टी आणि अभिषेक कुमार या पाच जणांमध्ये ट्रॉफीसाठी चुरस रंगली आहे.

एलिमिनेशनचा निर्णय जाहीर करण्यापूर्वी बिग बॉसने अंकिता आणि विकीला शोमध्ये सहभागी होण्याबद्दल प्रश्न विचारला होता. “जोडीने या शोमध्ये भाग घेतल्याबद्दल कसं वाटतंय”, असा प्रश्न बिग बॉसने विचारला होता. त्यावर उत्तर देताना अंकिता म्हणाली की, “माझ्यासाठी हा प्रवास खूप कठीण होता. कारण मी घरात सर्वांशी लढले, पण माझ्या पतीसोबत हरले.” तर विकीने सांगितलं की बिग बॉसमध्ये आल्यानंतर तो अंकितासोबतच्या नात्याला आणखी चांगल्याप्रकारे समजू शकला आहे. बिग बॉसमुळे लग्नाच्या सुरुवातीच्या वर्षांतच एकमेकांच्या चुकांमधून शिकण्याची संधी मिळाली, असं म्हणत त्याने आभार मानले.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.