Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अंकिता लोखंडेचा पती बनलाय घरजावई, 2 वर्षांपासून राहतोय तिच्यात घरी; नेमकं काय आहे कारण?

अभिनेत्री अंकिता लोखंडेनं (Ankita Lokhande) गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये विकी जैनशी (Vicky Jain) लग्न केलं. सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या जोडीपैकी ही एक जोडी आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत विकीने अंकिताच्या घरी घरजावई म्हणून राहत असल्याचं सांगितलं. गेल्या दोन वर्षांपासून विकी तिच्या घरी राहतोय.

अंकिता लोखंडेचा पती बनलाय घरजावई, 2 वर्षांपासून राहतोय तिच्यात घरी; नेमकं काय आहे कारण?
Ankita Lokhande and Vicky JainImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Mar 24, 2022 | 12:17 PM

अभिनेत्री अंकिता लोखंडेनं (Ankita Lokhande) गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये विकी जैनशी (Vicky Jain) लग्न केलं. सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या जोडीपैकी ही एक जोडी आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत विकीने अंकिताच्या घरी घरजावई म्हणून राहत असल्याचं सांगितलं. गेल्या दोन वर्षांपासून विकी तिच्या घरी राहतोय. यामागचं कारणही त्याने या मुलाखतीत सांगितलंय. ‘पवित्र रिश्ता’ (Pavitra Rishta) या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अंकिता ही लग्नापूर्वी काही वर्षे विकीला डेट करत होती. दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतशी ब्रेकअप झाल्यानंतर तिच्या आयुष्यात विकी आला. विकी हा गडगंज श्रीमंत कुटुंबातील असूनही तो अंकिताच्या घरी का राहतोय, असा प्रश्न अनेकांनी केला. लग्नानंतर अंकितासोबत राहताना कसं वाटतंय, असा प्रश्न विकीला या मुलाखतीत विचारण्यात आला होता. त्यावर त्याने घरजावई म्हणून तिच्याच घरी राहत असल्याचं सांगितलं.

“तुम्ही हा प्रश्न अंकिताला विचारायला हवा, कारण मीच तिच्या घरी घरजावईसारखा राहतोय. आम्ही नवीन फ्लॅट घेतला असून त्याच्या रिनोव्हेशनचं काम सुरू आहे. लॉकडाउन आणि कोरोना महामारीमुळे ते काम लवकर पूर्ण होऊ शकलं नाही. बांधकामाचं काम लांबत गेलं आणि अजूनही बरीच कामं बाकी आहेत. त्यामुळे आम्ही लग्नानंतर आमच्या नवीन घरात राहू शकलो नाही. मी जेव्हा कधी मुंबईला येतो, तेव्हा अंकिताच्याच घरी राहतो. त्यामुळे तिला कसं वाटतंय, असा प्रश्न विचारायला हवा. गेल्या दोन वर्षांपासून अंकिता तिचं घर, तिचं कपाट माझ्यासोबत शेअर करतेय”, असं विकी म्हणाला.

लग्नानंतरची अंकिता-विकीची पहिली होळी-

याविषयी अंकिता म्हणाली, “आम्ही जेव्हा आमच्या नवी घरात राहायला जाऊ, एका छताखाली पती-पत्नी म्हणून राहायला लागू, तेव्हा जोडपं म्हणून आमचा खरा प्रवास सुरू होईल असं मला वाटतं. मी खूप चांगली गृहिणी असेन आणि माझ्या घरातल्या गोष्टी मी खूप चांगल्याप्रकारे हाताळू शकेन, असा मला विश्वास आहे.”

अंकिता-विकीने 14 डिसेंबर 2021 रोजी मुंबईतल्या पंचतारांकित हॉटेलमध्ये धूमधडाक्यात लग्न केलं. नुकतीच या दोघांनी ‘स्मार्ट जोडी’ या शोमध्ये हजेरी लावली. या शोमध्ये त्यांनी अंकिताच्या आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्रीयन पद्धतीने पुन्हा एकदा लग्न केलं. विकी हा श्रीमंत व्यावसायिक कुटुंबातील असून त्याचे आई-वडील दोघंही व्यवसाय करतात. विकी बिलासपूरमधील महावीर इन्स्पायर ग्रुपचा व्यवस्थापकीय संचालक आहे.

हेही वाचा:

“विवेक अग्निहोत्रींना राज्यसभेत पाठवा, नाहीतर ते…”; The Kashmir Files वर काश्मिरी नेत्याचं मोठं विधान

200 कोटींची कमाई करणाऱ्या The Kashmir Filesच्या कलाकारांनी किती मानधन घेतलं?

सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी.
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले.
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर.
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त.
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?.