मुंबई : इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकॅडमी अवॉर्ड्स (IIFA) सोहळा दुबई येथे पार पडतोय. या इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकॅडमी अवॉर्ड्स सोहळ्यात बाॅलिवूडचे कलाकार जलवा करताना दिसत आहेत. या अवॉर्ड्स सोहळ्यातील अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल होताना दिसत आहेत. या अवॉर्ड्समधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये थेट विकी काैशल हा कतरिना कैफ हिच्या गाण्यावर तूफान डान्स करताना दिसतोय. विशेष म्हणजे विकी काैशल (Vicky Kaishal) याचा हा व्हिडीओ त्याच्या चाहत्यांना प्रचंड आवडल्याचे दिसत आहे.
इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकॅडमी अवॉर्ड्स सोहळ्यातील विकी काैशल याचा जो व्हिडीओ व्हायरल होत आहे, त्या व्हिडीओमध्ये त्याच्यासोबत सारा अली खान ही देखील दिसत आहे. या अवॉर्ड्स सोहळ्यामध्ये विकी काैशल याचा परफॉर्मन्स नव्हता. मात्र कतरिना कैफ हिचे गाणे सुरू होताच चक्क स्टेजवर विकी काैशलने डान्स करण्यास सुरूवात केली.
विशेष म्हणजे यावेळी सारा अली खान हिच्यासोबतच राखी सावंत देखील दिसत आहे. राखी सावंत, सारा अली खान आणि विकी काैशल हे स्टेजवर धमाल करताना दिसत आहेत. कतरिना कैफ हिचे गाणे शीला की जवानी हे अचानक सुरू होते आणि विकी काैशल हा लगेचच डान्स करण्यास सुरूवात करतो.
Rakhi just knocked Vicky over while dancing to sheila ki jawani ??? pic.twitter.com/Upe806OAc0
— celina ❦ (@bollyvfx1) May 27, 2023
विकी काैशल याला डान्स करताना पाहून सारा अली खान आणि राखी सावंत मस्ती करण्यास सुरूवात करतात. विशेष म्हणजे विकी काैशल याला डान्स करताना पाहून सारा आणि राखी सावंत देखील डान्सला सुरूवात करतात. विकी काैशल आणि सारा अली खान हे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या आगामी चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसत आहेत.
आलिया भट्ट ही देखील इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकॅडमी अवॉर्ड्स सोहळ्यात पोहचण्यासाठी निघाली होती. मात्र, आजोबांची तब्येत खराब असल्याने विमानळावरून आलिया भट्ट ही वापस आलीये. इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकॅडमी अवॉर्ड्स सोहळ्यात आलिया भट्ट हिच्या चित्रपटाला पुरस्कार मिळाला आहे.