सतत टीका होत असताना विकी काैशल याच्यासोबत सिद्धिविनायक मंदिरात पोहचली सारा अली खान, चित्रपटाचा धमाका सुरूच
बाॅलिवूड अभिनेत्री सारा अली खान आणि अभिनेता विकी काैशल हे चर्चेत आहेत. सारा अली खान आणि विकी काैशल यांचा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला. विशेष म्हणजे या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना सारा अली खान आणि अभिनेता विकी काैशल हे दिसले होते.
मुंबई : बाॅलिवूड अभिनेत्री सारा अली खान आणि विकी काैशल (Vicky Kaushal) हे गेल्या काही दिवसांपासून त्याच्या जरा हटके जरा बचके या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. सारा अली खान आणि विकी काैशल यांचा हा चित्रपट 2 जून रोजी रिलीज झालाय. विशेष म्हणजे चित्रपट (Movie) धमाल करताना दिसत आहे. चित्रपटाने आतापर्यंत 26 कोटींपेक्षा अधिक कमाई ही बाॅक्स आॅफिसवर केलीये. सारा अली खान आणि विकी काैशल यांच्या जोडीला प्रेक्षकांचे प्रेम मिळताना दिसत आहे. या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना सारा अली खान (Sara Ali Khan) आणि विकी काैशल यांची जोडी दिसली होती. प्रत्येक शहरांमध्ये जाऊन चित्रपटाचे प्रमोशन करताना सारा अली खान आणि विकी काैशल हे दोघे दिसले.
मुंबईमध्ये आपल्या कुटुंबियांसोबत चित्रपट बघण्यासाठी सारा अली खान ही पोहचली होती. विशेष म्हणजे सर्वसामान्य लोकांमध्ये चित्रपट सारा अली खान हिने बघितला. सारा अली खान ही प्रत्येक ठिकाणी आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसत आहे. कपिल शर्मा याच्या शोमध्येही सारा आणि विकी हे चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी पोहचले होते.
सारा अली खान आणि विकी काैशल यांची जोडी धमाका करताना दिसत आहे. चित्रपटाला प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत असतानाच आता सारा अली खान आणि विकी काैशल हे मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर पोहचले होते. यावेळी सारा अली खान आणि विकी काैशल हे गणपती बाप्पा समोर हात जोडून उभे असल्याचे दिसत आहे.
जवळपास सर्वच बाॅलिवूड स्टार हे सिद्धिविनायक मंदिरात जातात. सारा अली खान हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत सिद्धिविनायक मंदिरातील फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करताना सारा अली खान हिने लिहिले की, गणपती बाप्पा मोरया, सर्व गोष्टींसाठी धन्यवाद, शुभ मंगल…आता सारा अली खान हिची ही पोस्ट सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे.
काही दिवसांपूर्वीच उज्जैन येथील महाकाल मंदिरात दर्शन घेण्यासाठी सारा अली खान ही पोहचली होती. सारा अली खान हिने मंदिरातील फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. ज्यानंतर सारा अली खान हिला मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले. मात्र, ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर देताना सारा अली खान ही दिसत होती. अनेकांनी थेट तुझा धर्म नेमका कोणता हा प्रश्न देखील तिला विचारला होता.