Video | विकी कौशल याची धमाल, सौदा खरा खरा गाण्यावर अभिनेत्याने केला जबरदस्त डान्स, व्हिडीओ व्हायरल
विकी कौशल हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारा अभिनेता आहे. विशेष म्हणजे विकी कौशल याचे चित्रपट मोठा धमाका करताना दिसत आहेत. विकी कौशल याची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते.
मुंबई : बाॅलिवूड अभिनेता विकी काैशल (Vicky Kaushal) हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. विकी कौशल याचे चित्रपट मोठा धमाका करताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच विकी कौशल याचा जरा हटके जरा बचके हा चित्रपट (Movie) रिलीज झाला. या चित्रपटात विकी कौशल याच्यासोबत सारा अली खान ही मुख्य भूमिकेत धमाका करताना दिसली. विशेष म्हणजे यांची जोडी हिट ठरली आणि जरा हटके जरा बचके चित्रपट सुपरहिट ठरला. ज्यावेळी मोठ्या स्टारचे चित्रपट फ्लाॅप जात होते, त्यावेळी जरा हटके जरा बचके चित्रपटाने तूफान कमाई केली.
विकी कौशल आणि सारा अली खान हे त्यांच्या जरा हटके जरा बचके या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसले. विकी कौशल यांच्या चित्रपटाने बाॅक्स आॅफिसवर तगडी कमाई केली. इतकेच नाही तर आपल्या पतीच्या चित्रपटाचे प्रमोशन करताना कतरिना कैफ ही देखील दिसली. तिने या चित्रपटाचे पोस्टर शेअर करत चित्रपटाबद्दल माहिती दिली होती.
विकी कौशल हा कायमच चर्चेत असतो. नुकताच सध्या सोशल मीडियावर विकी कौशल याचा एक व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडीओमध्ये विकी कौशल हा धमाकेदार डान्स करताना दिसतोय. विशेष म्हणजे विकी कौशल याचा हा डान्स त्याच्या चाहत्यांना जबरदस्त आवडलाय. विकी कौशल हा आपल्या मित्रांसोबत खास डान्स करताना दिसतोय.
View this post on Instagram
विकी कौशल हा सौदा खरा खरा या गाण्यावर खास डान्स करताना दिसतोय. विशेष म्हणजे चाहत्यांना त्याच्या डान्सची स्टाईल प्रचंड आवडल्याचे दिसत आहे. आता विकी कौशल याचा हाच व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय. चाहते या व्हिडीओवर मोठ्या प्रमाणात कमेंट करताना देखील दिसत आहेत.
एका चाहत्याने म्हटले की, कतरिना कैफ हिच्यासारखी पत्नी असल्यावर अशाप्रकारचा डान्स करावाच लागतो. दुसऱ्याने लिहिले की, मी या संपूर्ण व्हिडीओमध्ये फक्त आणि फक्त विकी कौशल याच्याकडेच पाहत होतो. तिसऱ्याने लिहिले की, विकी कौशल याचा हा डान्स मला खूप जास्त आवडलाय. मी याच्या डान्सचा फॅन झालो आहे. विकी कौशल नेहमीच अशाप्रकारचे डान्स करताना दिसतो.