Gadar 2 मध्ये सनी देओलने हँडपंप का नाही उखडला? विकी कौशलच्या वडिलांनी सांगितलं मुख्य कारण

सनी देओल आणि हँडपंपचा सीन म्हटलं की सर्वांना 'गदर' हा चित्रपट आवर्जून आठवतो. तब्बल 22 वर्षांनंतर जेव्हा 'गदर 2' प्रदर्शित झाला, तेव्हा त्यातही हँडपंपचा सीन असायलाच हवा, असं दिग्दर्शकांचं मत होतं. मात्र या सीनमध्ये काही बदल करण्यात आले.

Gadar 2 मध्ये सनी देओलने हँडपंप का नाही उखडला? विकी कौशलच्या वडिलांनी सांगितलं मुख्य कारण
Sunny Deol Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Aug 29, 2023 | 7:21 PM

मुंबई | 29 ऑगस्ट 2023 : ‘गदर’ आणि ‘तारा सिंग’ म्हटलं की हँडपंपचा सीन आठवल्याशिवाय राहत नाही. 22 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘गदर : एक प्रेम कथा’ या चित्रपटातील अभिनेता सनी देओलचा हँडपंप उखडतानाचा सीन प्रचंड चर्चेत आला होता. हा सीन आजही चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहे. आता 22 वर्षांनंतर जेव्हा ‘गदर 2’ हा चित्रपट प्रदर्शित झाला, तेव्हा पुन्हा एकदा त्याच सीनची चर्चा झाली. मात्र या सीक्वेलमधील हँडपंपच्या सीनमध्ये थोडा बदल करण्यात आला. अभिनेता विकी कौशलचे वडील आणि प्रसिद्ध ॲक्शन डायरेक्टर सनी कौशल यांनी सीन दिग्दर्शित केला आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी या सीनमागील गोष्ट उलगडून सांगितली.

‘गदर 2’मध्ये सनी देओलने हँडपंप पाहिला, पण..

ई-टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत शाम कौशल हे हँडपंपच्या सीनबद्दल म्हणाले, “आम्हाला असं वाटलं की जर त्या सीनमध्ये आम्ही ॲक्शन दाखवला, तर तो पहिल्याच भागाचा सीन पुन्हा दाखवल्यासारखा होईल. आम्हाला तो सीन असा डिझाइन करायचा होता, ज्यामध्ये फारसा ॲक्शन नसेल पण तरी तो तितकाच प्रभावशाली वाटेल. मी तो सीन माझ्या डोक्यात व्हिज्युअलाइज केला. सनी देओलपेक्षाही मोठी ताकद त्याच्या मागे उभी आहे असं आम्हाला दाखवायचं होतं. त्यामुळे त्याच्या मागे मोठा जमाव आणला आणि त्या जमावाकडे सनी पाजी एक कटाक्ष टाकतात. त्यानंतर आम्ही हँडपंप दाखवला आणि जेव्हा सनी पाजी तो हँडपंप उखडायला जातात, तेव्हा जमाव घाबरून पळून जातो. हा सीन असा यासाठी डिझाइन केला, जेणेकरून प्रेक्षकांना पहिल्या भागातील तोच सीन आठवेल आणि नव्या सीक्वेलमधील सीनचं मूल्यही जपलं जाईल.”

हँडपंप सीनच्या शूटिंगचा अनुभव

हँडपंपचा सीन शूटिंग करतानाचा अनुभव कसा होता, याविषयी शाम कौशल व्यक्त झाले. त्यांनी पुढे सांगितलं, “थेट ॲक्शन सीन करणं खूप सोपं असतं. पण स्टंटशिवाय ॲक्शन सीन दाखवणं खूप कठीण असतं. कारण एक चुकीचा शॉट संपूर्ण सीन खराब करू शकतो. गदर 2 हा दिग्दर्शक अनिल शर्मा आणि सनी देओल यांच्या मेहनतीचं फळ आहे. या चित्रपटातून देसीपणा जाणवतो. सर्वसामान्य तंत्रज्ञानांच्या मदतीने हा चित्रपट पूर्ण करण्यात आला आहे. कोणत्याही ॲक्शन सीनच्या शूटिंगआधी सनी देओल सर्वकाही शांतपणे समजून घेतो. तो त्याच्या ऊर्जेचा योग्य ठिकाणी वापर करतो आणि कॅमेरा सुरू होताच त्याच्यातील एक वेगळी व्यक्ती जागृत होते. हँडपंपचा सीन जर सीक्वेलमध्ये नसता तर प्रेक्षकांना काहीतरी अपूर्ण नक्कीच वाटलं असतं.”

हे सुद्धा वाचा

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.