रमजान सुरु होतात विकी कौशलचं मोठं वक्तव्य चर्चेत, ‘छावा सिनेमाच्या सेटवर रोझा…’
Vicky Kaushal on Ramadan: 'छावा' सिनेमा, रमजान आणि रोझा..., कसं होतं सिनेमाच्या सेटवरील वातावरण, रमजान सुरु होतात विकी कौशलचं मोठं वक्तव्य चर्चेत, 'छावा' सिनेमामुळे विकीच्या लोकप्रियतेत आणि प्रसिद्धीत वाढ

Vicky Kaushal on Ramadan: अभिनेता विकी कौशल सध्या ‘छावा’ सिनेमामुळे प्रसिद्धी झोतात आहे. गेल्या 18 दिवसांपासून सिनेमा मोठ्या पडद्यावर राज्य करत आहे. विकीचे सिनेमाचं प्रमोशन देखील दणक्यात केलं. दरम्यान, विकीने ‘छावा’ सिनेमाच्या प्रमोशन मुलाखतीत एक वक्तव्य केलं होतं. जे सध्या तुफान व्हायरल होत आहे. विकीने ‘छावा’ सिनेमाचं शुटिंग आणि रमजानच्या महिन्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.
सांगायचं झालं तर, ‘छावा’ सिनेमाच्या शुटिंगसाठी प्रचंड मोठा कालावधी लागला. सर्व सीन योग्य प्रकारे शूट झाल्यानंतर अनेक 14 फेब्रुवारी रोजी सिनेमा चाहत्यांच्या भेटीस आला आणि सिनेमाने अनेक नवीन विक्रम रचले. मुलाखतीत शुटिंगचा किस्सा सांगताना अभिनेता म्हणाला, ‘शुटिंग सुरु होती. उन्हाचे दिवस होते आणि अनेक स्टंटमॅन सेटवर होते. जे ‘छावा’च्या सेटव रोझा ठेवून ॲक्शन सीन शूट करत होते. ‘
‘शुटिंग सुरु करण्यापूर्वी आम्ही अनेक महिने ॲक्शन सीनसाठी सराव करत होतो. मला सांगायला आवडेल, वाईमध्ये आम्ही शुटिंग करत होतो. टीझरमध्ये ॲक्शन सीनचा चंक दाखवण्यात आला आहे. कडकडत्या उन्हात 2 हजार लोकांच्या गर्दीत आम्ही शुटिंग करत होतो. जवळपास 500 स्टंटमॅन होते. रमजानचा महिना होता.’




‘छत्रपती संभाजी महाराज यांचं शौर्य दाखवण्यासाठी त्यामधील अनेक स्ंटटमॅन काहीच न खाता – पीता रोझा असताना शुटिंग करत होते. ॲक्शन सीन शुट करत होते…’ विकीने असेही सांगितलं की, सिनेमाच्या सेटवर अशा अनेक गोष्टी घडल्या, ज्या पाहून तिला काहीतरी चांगले घडतंय असं वाटत होतं. भारतात 2 मार्चपासून रमजान महिना सुरू झाला आहे. रमजान सुरू होताच विकीचं हे वक्तव्य पुन्हा एकदा सोशल मीडियावर आणि चाहत्यांमध्ये चर्चेत आलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त छावा सिनेमाची चर्चा सुरु आहे.
‘छावा’ सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन
गेल्या तीन आठवड्यापासून बक्कळ कमाई करणाऱ्या ‘छावा’ सिनेमाचा वेग मंदावला आहे. पहिल्या आठवड्यात सिनेमाने 219.25 कोटींची कमाई केली. त्यानंतर दुसऱ्या आठवड्यात सिनेमाने 180.25 कोटींची कमाई केली.
सिनेमाने 17 व्या दिवशी 25 कोटींची कमाई केली आहे. 18 व्या दिवशी मात्र सिनेमाच्या कमाईचा वेग मंदावला आहे. 18 व्या दिवशी सिनेमाने फक्त 8.5 कोटींची कमाई केली आहे. म्हणजे 18 दिवसांमध्ये सिनेमाने भारतात 467.25 कोटींची कमाई केली आहे.