कतरिनाच्या एक्स बॉयफ्रेंडसोबत विकी कौशलची टक्कर; काय म्हणाला अभिनेता?

विकी कौशलच्या 'सॅम बहादूर' या चित्रपटात अभिनेत्री सान्या मल्होत्रा त्यांच्या पत्नी सिलोच्या भूमिकेत आहे. तर फातिमा सना शेखने इंदिरा गांधींची भूमिका साकारली आहे. याशिवाय नीरज काबी आणि मोहम्मद झीशान अयुब यांनी जवाहरलाल नेहरू, याह्या खान यांच्या भूमिका साकारल्या आहेत.

कतरिनाच्या एक्स बॉयफ्रेंडसोबत विकी कौशलची टक्कर; काय म्हणाला अभिनेता?
Vicky Kaushal and Katrina KaifImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Oct 14, 2023 | 11:23 AM

मुंबई | 14 ऑक्टोबर 2023 : बॉक्स ऑफिसवर अनेकदा विविध चित्रपटांची एकाच वेळी टक्कर होत असते. मात्र जो चित्रपट खरंच प्रेक्षकांना आवडतो, तो बॉक्स ऑफिसवर तगडी टक्कर असतानाही दमदार कमाई करतो. आगामी काळात दोन तगड्या कलाकारांच्या चित्रपटांची टक्कर होणार आहे. विकी कौशलचा ‘सॅम बहादूर’ आणि रणबीर कपूरचा ‘ॲनिमल’ हे दोन्ही चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होणार आहेत. त्यातही विकीची पत्नी कतरिना कैफचा रणबीर एक्स बॉयफ्रेंड असल्याने या दोघांमधील बॉक्स ऑफिस टक्कर कशी असणार, याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. विकी कौशलने नुकतीच यावर प्रतिक्रिया दिली आहे.

बॉक्स ऑफिस टक्कर

विकी कौशलचा ‘सॅम बहादूर’ आणि रणबीर कपूरचा ‘ॲनिमल’ हे दोन्ही चित्रपट येत्या 1 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहेत. ‘सॅम बहादूर’ या चित्रपटाचं दिग्दर्शन मेघना गुलजारने केलं असून फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्या आयुष्यावर आधारित हा बायोपिक आहे. तर दुसरीकडे ‘ॲनिमल’ या चित्रपटाचं दिग्दर्शन ‘कबीर सिंग’ फेम दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा याने केलं आहे. नुकताच ‘सॅम बहादूर’चा ट्रेलर प्रदर्शित झाला. यावेळी विकी कौशलला रणबीरसोबतच्या बॉक्स ऑफिस टक्करविषयी प्रश्न विचारण्यात आला.

विकी कौशलचं मत

“त्या शुक्रवारी, मी आणि रणबीर दोघं मिळून आमचे चित्रपट प्रेक्षकांच्या हाती सोपवणार आहोत. त्यामुळे तो शुक्रवार हा आमच्यापेक्षा अधिक प्रेक्षकांचा असेल. आज एक इंडस्ट्री म्हणून आपण प्रेक्षकांना एकाच दिवशी विविध पर्याय उपलब्ध करून दिले पाहिजे. असं केल्यानेच आपली इंडस्ट्री अधिक संपन्न होईल. एका वर्षात ठराविक शुक्रवार येतात, पण आपण फक्त तेवढेच चित्रपट काढून स्वत:ला मर्यादित ठेवू शकत नाही. त्यामुळे एकाच दिवशी दोन ते तीन चित्रपट प्रदर्शित होऊ शकतात आणि अशा प्रकारे आपण विविध चित्रपटांसाठी एकत्रित काम करण्याचं सकारात्मक वातावरण निर्माण करू शकतो”, अशी प्रतिक्रिया विकीने दिली.

हे सुद्धा वाचा

कोणत्याही दोन चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर टक्कर झाली, तरी जो चित्रपट प्रेक्षकांना आवडतो, तोच यशस्वी ठरतो, असंही विकी यावेळी म्हणाला. “जर प्रेक्षकांना दोन्ही चित्रपट आवडले तर दोन्ही चित्रपटांना यश मिळू शकतं. मी सुद्धा इतरांप्रमाणेच रणबीरच्या ॲनिमल या चित्रपटासाठी फार उत्सुक आहे. प्रेक्षकांसाठी तो दिवस खूप चांगला असेल. आम्ही त्यांच्यासाठी काम करतो, एकमेकांसाठी नाही”, असं विकी कौशलने पुढे स्पष्ट केलं.

सॅम माणेकशॉ हे पहिले भारतीय सैन्य अधिकारी होते, ज्यांना फिल्ड मार्शल पदावर बढती मिळाली होती. 1971 च्या युद्धात पाकिस्तानवर भारताने मिळवलेल्या विजयाचं श्रेय त्यांना दिलं जातं.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.