Vicky Kaushal ची अखेर ६ वर्षांनंतर इच्छा पूर्ण ; कतरिना नाही तर, या व्यक्तीसोबत खास कनेक्शन
या व्यक्तीला भेटण्यासाठी विकी कौशल याने केली ६ वर्ष प्रतीक्षा ; कतरिना हिच्या शिवाय कोणाला अभिनेत्याच्या आयुष्यात महत्त्वाचं स्थान? सोशल मीडियावर सर्वत्र विकीच्या आयुष्यातील महत्त्वाच्या व्यक्तीचीच चर्चा
Vicky Kaushal Secrete Wish FulFill : ‘उरी’ सिनेमानंतर अभिनेता विकी कौशल याच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली. त्यानंतर अभिनेता बॉलिवूडची क्यूट अभिनेत्री कतरिना कैफ हिच्यासोबत लग्नानंतर तुफान चर्चेत आला. विकी – कतरिना यांच्या लग्नानतंर फोटो आणि व्हिडीओंनी चाहत्यांचं मन जिंकलं. लग्नानंतर अनेकदा दोघांना कुटुंबासोबत स्पॉट करण्यात आलं आहे. पण आता विकी कतरिना किंवा कुटुंबासोबत नाही तर, त्याच्या आयुष्यातील एका खास व्यक्तीसोबत दिसत आहे. विकीने त्याच्या आयुष्यातील खास व्यक्तीचा फोटो आणि आठवणी चाहत्यांसोबत शेअर केल्या आहे.
गेल्या काही दिवसांपासून विकी सोशल मीडियावर सक्रिय दिसत आहे. अभिनेत्याच्या आयुष्यातील खास व्यक्ती पत्नी कतरिना नसून फिल्ममेकर मेघना गुलझार आहेत. मेघना गुलझार यांच्यासोबत विकीचं खास कनेक्शन आहे. सध्या दोघांचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
मेघना यांच्यासोबत फोटो शेअर करत विकी कॅप्शनमध्ये म्हणतोय, ‘६ वर्षांपूर्वी २०१७ साली पंजाबमध्ये ‘राझी’ सिनेमाची शुटिंग करत होतो. तेव्हा याच गच्चीवर मेघना गुलझार यांनी सॅम बहादुर सिनेमाबद्दल थोडक्यात सांगितलं. एक दिवस मला या भुमिकेसाठी कॉल यायला हवा असं मनातल्या मनात प्रर्थना केली. आज मी आणि मेघना त्याच गच्चीवर बसून सॅम बहादुर सिनेमाचं शुटिंग करत आहोत.’ असं म्हणत विकीने मनातील भावना व्यक्त केल्या.
सांगायचं झालं तर, विकी लवकरच फिल्ड मार्शल सॅम मानेरशॉ यांच्या बायोपिकमध्ये महत्त्वाच्या भुमिकेत दिसणार आहे. सॅम हे भारतीय लष्कराचे अधिकारी होते. १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान ते भारतीय लष्कराचे लष्करप्रमुखही होते. विकी त्यांची भूमिका मोठ्या पडद्यावर साकारणार आहे.
‘सॅम बहादुर’ सिनेमात विकी कौशल याच्यासोबतच अभिनेत्री फातिमा सना शेख आणि सान्या मल्होत्रा देखील झळकरणार आहेत. सिनेमा १ डिसेंबर २०२३ रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. सध्या सर्वत्र विकी स्टारर सॅम बहादुर सिनेमाची चर्चा आहे.