‘पुष्पा 2’चा फिव्हर; विकी कौशलचा ‘छावा’ चित्रपटाची तारिख पुढे ढकलली, आता कधी होणार चित्रपट रिलीज?
'पुष्पा 2: द रुल' ची एक वेगळीच क्रेझ पाहायला मिळतेय. 'पुष्पा 2: द रुल'चे अॅडव्हान्स बुकिंग पाहाता छावा चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. 'छावा' चित्रपटाची नवीन रिलीज डेटही सांगण्यात आली आहे. पण चित्रपट हा थेट पुढल्या वर्षी रिलीज होणार आहे.
‘पुष्पा 2: द रुल’ ची एक वेगळीच क्रेझ पाहायला मिळतेय. रिलीजआधीच प्रेक्षकांनी तिकीटे बुक करून ठेवली आहेत. चित्रपट रिलीज होण्यासाठी आत काहीच दिवस उरले असताना तिकीटे बुक होण्याची संख्याही वाढत चालली आहे. त्यामुळे पुष्पासोबतच रिलीज होणाऱ्या चित्रपटांसमोर तगड आव्हान असणार आहे. आणि म्हणूनच ‘पुष्पा 2’ सोबत रिलीज होणाऱ्या काही चित्रपटांची रिलीज डेट पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्याचा निर्णय
‘पुष्पा 2’ सोबत रिलीज होणाऱ्या काही चित्रपटांची रिलीज डेट पुढे ढकलण्याचा निर्णय घेतलेल्या चित्रपटांमध्ये विकी कौशलचा ‘छावा’ चित्रपटही आहे. विकी कौशलचा ‘छावा’ चित्रपट डिंसेबर 2024 मध्ये रिलीज होणार होता. मात्र चित्रपटाची तारिख एक आठवड्याआधी अचानक बदलण्यात आली. ‘छावा’ चित्रपट या महिन्यात म्हणजेच डिसेंबर रिलीज होणार नसून, थेट पुढच्या वर्षी रिलीज होणार आहे.
बॉलिवूड अभिनेता विकी कौशलचा ‘छावा’ चित्रपट ऐतिहासिक कालखंडावर आधारित आहे. चित्रपटात विकी छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. चित्रपटाचा ट्रेलरही जोरदार चर्चेत आहे. त्यामुळे सगळेच हा चित्रपट रिलीज होण्याची आतुरतेने वाट बघत होते. पण ‘पुष्पा 2’ आणि ‘छावा’ हा एका दिवसाच्या फरकाने रिलीज होणार होते. म्हणजे ‘पुष्पा 2’ हा 5 डिसेंबरला रिलीज होणार असून, छावा चित्रपट 6 डिसेंबरला बॉक्स ऑफिसवर झळकणार होता.
मात्र ‘पुष्पा 2’ची क्रेझ पाहाता आणि त्याचे अॅडव्हान्स बुकिंग पाहाता छावा चित्रपटाची रिलीज डेट बदलण्यात आली असल्याचे म्हटले जाते. दिनेश विजन यांच्या मॅडॉक्स फिलम्सने याची निर्मिती केली आहे. ‘पुष्पा 2’ च्या रिलीजच्या पार्श्वभूमीवर छावा चित्रपटाच्या निर्मात्यांनी हा निर्णय घेतला असल्याचे म्हटले जाते. ‘छावा’ची नवीन डेट रिलीज करण्यात आली आहे.
‘छावा’ चित्रपट थेट पुढच्या वर्षी रिलीज
‘छावा’ चित्रपट आता 14 फेब्रुवारी 2025 रोजी बॉक्सऑफिसवर झळकणार आहे. त्यामुळे चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांना आणखी प्रतिक्षा करावी लागणार आहे. विशेष म्हणजे, 19 फेब्रुवारी 2025 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. त्यामुळे या तारखेला विशेष महत्त्व दिले आहे.
विक्की कौशलसोबत या चित्रपटात अभिनेत्री रश्मिका मंदान्ना, छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी येसूबाई भोसले यांच्या भूमिकेत दिसणार आहे त्याचबरोबर बॉलिवूड अभिनेता अक्षय खन्ना, आशुतोष राणा आणि दिव्या दत्ता यांसारखे दिग्गज कलाकारही या चित्रपटात आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केलं आहे.