पाकिस्तानी मास्टरशेफची जोरदार चर्चा, शोमध्ये घेऊन पोहोचली अशी बिर्याणी; स्पर्धकाला दाखवला बाहेरचा रस्ता

हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया येत आहेत. 'सर्वांत विनोदी व्हिडीओचा पुरस्कार याला द्या', असं एकाने म्हटलंय. तर 'पाकिस्तान आहे, आणखी काय अपेक्षा करावी', असं दुसऱ्या युजरने लिहिलं आहे.

पाकिस्तानी मास्टरशेफची जोरदार चर्चा, शोमध्ये घेऊन पोहोचली अशी बिर्याणी; स्पर्धकाला दाखवला बाहेरचा रस्ता
पाकिस्तानी कुकिंग शोचा व्हिडीओ व्हायरलImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Mar 01, 2023 | 8:26 AM

लाहौर : पाकिस्तानच्या मास्टरशेफमध्ये एक स्पर्धक अशी डिश घेऊन पोहोचली, ज्याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होतेय. ही चर्चासुद्धा अशी आहे की तुम्हालाही हसू अनावर होईल. सध्या सोशल मीडियावर या ऑडिशनचा व्हिडीओ वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होत आहे. मास्टरशेफ हा कुकिंग रिॲलिटी शो आहे, जिथे सर्वोत्कृष्ट जेवण बनवणाऱ्याला विजेता म्हणून घोषित केलं जातं. अशा शोचं नाव ऐकून तुम्ही काय विचार करणार? हेच ना की या रिॲलिटी शोमध्ये तुम्हाला तुमच्या हाताने विविध खाद्यपदार्थ बनवायचे आहेत. त्यातील परीक्षकांना जर तुम्ही बनवलेले पदार्थ आवडले, तर तुम्हाला शोमध्ये एण्ट्री मिळेल. अन्यथा बाहेरचा रस्ता दाखवला जाईल. मात्र पाकिस्तानमधल्या या कुकिंग शोमध्ये वेगळाच प्रकार घडला आहे.

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ पाकिस्तानी कुकिंग शो ‘द किचन मास्टर’चा आहे. यामध्ये एक महिला स्पर्धक बिर्याणी घेऊन येते आणि परीक्षकांसमोर सादर करते. सुरुवातीला परीक्षक त्या महिलेशी खूप प्रेमाने बोलतात. त्या बिर्याणीची खास गोष्ट काय आहे, असं विचारतात. स्पर्धकाने बिर्याणी एका साध्या कंटेनरमध्ये आणलेली असते. त्यामुळे परीक्षक तिला विचारतात की तुम्ही ही डिश आमच्यासमोर सजवणार आहात का? तुम्हाला प्लेट हवी का? मात्र जेव्हा त्या डिशचं सत्य परीक्षकांना समजतं, तेव्हा त्यांचा राग अनावर होतो.

हे सुद्धा वाचा

पहा व्हिडीओ

परीक्षक का भडकले?

परीक्षकांचा राग अनावर होण्यामागचं कारण म्हणजे ती स्पर्धक जी बिर्याणी आणते, ती तिने बनवलेली नसते. कुकिंग शोच्या ऑडिशनमध्ये एखादी डिश घेऊन जायची असते, असं त्या स्पर्धकाला वाटतं आणि त्यामुळेच ती एका दुकानातून बिर्याणी विकत घेऊन तिथे पोहोचते. हे ऐकून परीक्षकांना धक्का बसतो. आधी त्यांना हसू येतं आणि नंतर ते त्या स्पर्धकाला बाहेरचा रस्ता दाखवतात. मात्र तरीसुद्धा ती महिला शोमधून बाहेर जाण्यास नकार देते. “मी नाही जाणार, मी खूप मेहनतीने ही बिर्याणी आणली आहे. तुम्हाला ती खावीच लागेल”, असं ती म्हणते. हे ऐकून परीक्षकांचा आणखी पारा चढतो आणि त्यातील एक जण तिथून उठून निघून जाते.

हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया येत आहेत. ‘सर्वांत विनोदी व्हिडीओचा पुरस्कार याला द्या’, असं एकाने म्हटलंय. तर ‘पाकिस्तान आहे, आणखी काय अपेक्षा करावी’, असं दुसऱ्या युजरने लिहिलं आहे. द किचन मास्टर या शोमध्ये तीन महिला परीक्षक आहेत. शेफ सामिया जामिल, राबिया अनुम आणि अम्मारा या तिघी जणी या शोचं परीक्षण करत आहेत. मात्र परीक्षकपदी तिघी महिलाच का आहेत, असाही सवाल काहींनी केला.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.