VIDEO | अलविदा करण्याआधी शेवटचं शूट, सिद्धूसोबत डान्स, रमेश देव यांचे अखेरचे क्षण

रमेश देव यांनी पाटलाची पोर या चित्रपटात पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती. त्यानंतर राजा परांजपे यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘आंधळा मागतो एक डोळा’ या सिनेमातून त्यांनी अभिनेता म्हणून खऱ्या अर्थाने आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली.

VIDEO | अलविदा करण्याआधी शेवटचं शूट, सिद्धूसोबत डान्स, रमेश देव यांचे अखेरचे क्षण
रमेश देव यांचं शेवटचं शूट, सिद्धूसोबत डान्स
Follow us
| Updated on: Feb 11, 2022 | 11:31 AM

मुंबई – रमेश देव (ramesh dev) यांचं हृदय विकाराच्या (Heart Attack) झटक्यानं नुकतंच निधन झालं त्यांनी वयाच्या 93 वर्षी अखेरचा श्वास घेतला. 30 जानेवारीला त्यांनी वाढदिवस साजरा केला होता. त्यानंतर काही दिवसातचं त्याचं निधन झालं. हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीत त्यांनी चांगलं नाव कमावलं होतं. तसेच त्या काळातला देखणा हिरो म्हणून त्यांची एक वेगळी ओळख होती. त्याचबरोबर त्यांच्या पत्नी सीमा देव (seema dev) आणि रमेश देव यांच्या प्रेमाची नेहमी चर्चा होते. रमेश देव यांनी अखेरचा श्वास घेण्याआगोदर झी मराठी (zee marathi) वाहिनीतील ‘हे तर’ काहीच नाय कार्यक्रमात ते गेले होते. ते रमेश देव यांचं अखेरचं शूट ठरलं आहे. त्यावेळी जिंदगी लंबी नही बडी होनी चाहिए हा संवाद सुध्दा त्यावेळी तिथं लावण्यात आहे. तसेच सुर तेची सोडिता, गीत उमटले नवे या गाण्यावर रमेश देव डान्स देखील केला. हा कार्यक्रम झी मराठी वाहिनीवर साडेनऊ वाजता दाखला जाणार आहे. झी मराठीकडून एक व्हिडीओ तयार करण्यात आला असून तो रात्री त्यांच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवरून शेअर कऱण्यात आला आहे. त्यामुळे अनेकांना त्या कार्यक्रमाबाबत उत्सुकता वाटत आहे. तसेच अनेक चाहत्यांनी त्या व्हिडीओ खाली कमेंट केल्या आहेत.

स्वर्गीय रमेश देव याचे बहारदार सोनेरी क्षण

रमेश देव, श्रीरंग गोडबोले, अशोक हांडे असे कलाकार ‘हे तर’ काहीच नाय या कार्यक्रमात अनेक कलाकार होते. त्यावेळी त्यांच्या अनेक आठवणींना तिथं पुन्हा नव्याने उजाळा दिला असल्याचे समजते. तसेच सुर तेची सोडिता, गीत उमटले नवे या गाण्यावर रमेश देव यांनी अभिनेता सिध्दार्थ जाधन यांच्यासोबत आणि दोन कलाकारांसोबत डान्स केल्याचं व्हिडीओत पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर तिथं त्यांच्या जुन्या चित्रपटातीतली अनेक डायलॉग सुध्दा म्हणाल्याची चर्चा आहे. आज हा कार्यक्रम दाखवण्यात येणार असून त्यामध्ये तुम्ंहाला रमेश देव यांचे शेवटचे शुट पाहायला मिळेल.

1951 मध्ये अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं

रमेश देव यांनी पाटलाची पोर या चित्रपटात पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती. त्यानंतर राजा परांजपे यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘आंधळा मागतो एक डोळा’ या सिनेमातून त्यांनी अभिनेता म्हणून खऱ्या अर्थाने आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. रमेश देव यांनी आत्तापर्यंत 180 चित्रपटात काम केले आहे. त्यामुळे त्यांच्या नावाला मराठी आणि हिंदी इंडस्ट्रीमध्ये वेगळं वलय आहे.

द फेम गेम’ ‘मधून माधुरीचं डिजिटल जगात पदार्पण, धमाकेदार ट्रेलर रिलीज, झगमगाटी विश्वामागचं गडद सत्य

भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....