Vidya Balan | विद्या बालनचं सर्वात हॉट फोटोशूट; सोशल मीडियावर पुन्हा होतेय चर्चा

| Updated on: Mar 08, 2023 | 8:02 AM

विद्या बालनने सिद्धार्थ रॉय कपूरसोबत लग्न केलंय. या दोघांची पहिली भेट फिल्मफेअर अवॉर्ड्सदरम्यान झाली होती. पहिल्या भेटीनंतर दोघांची मैत्री झाली आणि नंतर या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. दोघांनी 14 डिसेंबर 2012 रोजी लग्न केलं.

Vidya Balan | विद्या बालनचं सर्वात हॉट फोटोशूट; सोशल मीडियावर पुन्हा होतेय चर्चा
Image Credit source: Instagram
Follow us on

मुंबई : अभिनेत्री विद्या बालन ही बॉलिवूडमधल्या दमदार अभिनेत्रींपैकी एक आहे. जेव्हा जेव्हा ती मोठ्या पडद्यावर आली, तेव्हा तिने आपल्या सहज अभिनयाने चाहत्यांची मनं जिंकली आहेत. तर इश्किया आणि द डर्टी पिक्चर यांसारख्या चित्रपटांमध्ये तिने बोल्डनेसचा तडका लावला. जवळपास आठ वर्षांपूर्वी विद्याने एक बोल्ड फोटोशूट केलं होतं. आता पुन्हा एकदा तो फोटोशूट चर्चेत आला आहे. हा फोटो प्रसिद्ध सेलेब्रिटी फोटोग्राफर डब्बू रत्नानीने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

2015 मध्ये विद्या बालनने डब्बू रत्नानीच्या कॅलेंडरसाठी हा फोटोशूट केला होता. आता आठ वर्षांनंतर त्याने पुन्हा एकदा हा फोटो शेअर केल्याने त्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होतेय. या फोटोमध्ये विद्याचा सर्वात बोल्ड अंदाज पाहायला मिळतोय. या क्लॉथलेस फोटोशूटमध्ये तिने फक्त न्यूजपेपरने स्वतःला झाकलं आहे. तिच्या एका हातात कॉफीचा कप आणि दुसऱ्या हातात वर्तमापत्र आहे. गॉगल आणि हाय हिल्समुळे हा लूक अधिक ग्लॅमरस वाटतोय.

हे सुद्धा वाचा

पहा फोटो-

डब्बू रत्नानीने शेअर केलेल्या या फोटोवर नेटकऱ्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय. कोणती हॉट न्यूज आहे का असं एकाने लिहिलंय. तर ‘द डर्टी पिक्चर’ची आठवण आली, असं दुसऱ्या युजरने म्हटलंय. ‘द डर्टी पिक्चर’चा सी येणार आहे का, असाही सवाल एका नेटकऱ्याने केला आहे.

विद्या बालनचा जन्म मुंबईतील चेंबूर इथल्या एका तमिळ कुटुंबात झाला. विद्याने वयाच्या 16 व्या वर्षी ‘हम पांच’ या मालिकेतून आपल्या करिअरची सुरुवात केली. परंतु विद्याला तिचं करिअर चित्रपटांमध्ये करायचं होतं. मल्याळम आणि तमिळ चित्रपटांमध्ये अनेक प्रयत्न करूनही ती अपयशी ठरली होती. ‘हे बेबी’ आणि ‘किस्मत कनेक्शन’ या चित्रपटांमधील तिचं वाढलेलं वजन आणि विद्याच्या आउटफिटमुळे तिच्यावर अनेकदा टीका झाली. यामुळे विद्या इतकी निराश झाली होती की तिने इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतला होता.

विद्याने ‘लगे रहो मुन्ना भाई’, ‘गुरु’ आणि सलाम-ए-इश्क’ यांसारखे अनेक हिट चित्रपट दिले. पण, 2011 मध्ये आलेल्या ‘द डर्टी पिक्चर’ या चित्रपटाने तिचं नशीब बदललं. या चित्रपटासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.