Vidya Balan | विद्या बालन हिचा खळबळजनक खुलासा, दिग्दर्शकाने हॉटेलच्या रूममध्ये भेटायला बोलावले आणि पुढे धक्कादायक
बाॅलिवूड अभिनेत्री विद्या बालन हिने नुकताच एक मोठा खुलासा केला आहे. विद्या बालन हिचे बोलणे ऐकून सर्वांनाच मोठा धक्का बसल्याचे दिसत आहे. विद्या बालन ही कायमच चर्चेत राहणारी एक अभिनेत्री आहे. विद्या बालन ही सोशल मीडियावर देखील कायमच सक्रिय दिसते.
मुंबई : बाॅलिवूड अभिनेत्री विद्या बालन (Vidya Balan) ही सध्या तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. 7 जुलै रोजी विद्या बालन हिचा नीयत हा चित्रपट (Movie) रिलीज होतोय. नीयत चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना विद्या बालन ही दिसत आहे. विद्या बालन ही नेहमीच चर्चेत राहणारी अभिनेत्री आहे. काही दिवसांपूर्वीच विद्या बालन हिने एक फोटोशूट केले होते, ज्यामुळे मोठ्या वादाला तोंड फुटले. अनेकांनी त्यावेळी विद्या बालन हिच्यावर टिका केली होती. विद्या बालन हिने त्या फोटोशूटमध्ये आपले अंग हे पेपरने झाकले होते. विद्या बालन हिचे हे फोटोशूट (Photoshoot) पाहून अनेकांनी तिला खडेबोल सुनावले होते.
विद्या बालन हिने नुकताच एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये विद्या बालन हिने धक्कादायक खुलासा केला आहे. विद्या बालन हिचे बोलणे ऐकून चाहतेही हैराण झाल्याचे बघायला मिळत आहेत. विद्या बालन म्हणाली की, कास्टिंग काउचचा शिकार होताना मी थोडक्यात वाचले होते. ती एक माझ्यासाठी खूप जास्त वेगळी घडना नक्कीच होती.
एका चित्रपट डायरेक्टरने मला थेट हाॅटेल रूममध्ये भेटण्यासाठी बोलावले होते. मला चित्रपटाच्या संदर्भात त्या डायरेक्टरला भेटायचे होते. मी चित्रपटाच्या कामानिमित्त चेन्नईमध्येच होते. मी त्या डायरेक्टरला म्हटले होते की, आपण कॉफी शॉपमध्ये भेटूयात. पण त्याला माझ्यासोबत हाॅटेल रूममध्येच भेटायचे होते.
मी त्या डायरेक्टरला बरेच समजवण्याचा प्रयत्न केला. पण त्याचे म्हणणे होते की, आपण रूममध्ये भेटणे योग्य राहिल. मग तो डायरेक्टर माझ्या रूममध्ये आला. मात्र, त्यावेळी मी समझदारी दाखवत हाॅटेलच्या रूमचा दरवाजा उघडा ठेवा. यामुळे तो डायरेक्टर पाच मिनिटांच्या आतामध्येच रूममधून बाहेर गेला. आताही मला हे सर्व आठवले की हसू येते.
पुढे विद्या बालन म्हणाली की, त्यानंतर मला त्या चित्रपटातून काढून टाकण्यात आले. विद्या बालन हिने अत्यंत मोठा खुलासा केला आहे. विद्या बालन हिने काही दिवसांपूर्वीच एक मोठा किस्सा सांगितला की, एका चॅलेंजसाठी तिने 5 स्टार हाॅटेलसमोर थेट भीक मागितली आहे. विद्या बालन हिने तिच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका या केल्या आहेत.