धार्मिक वास्तू उभारण्यासाठी देणगी देत नाही; विद्या बालनने सांगितलं कारण

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्री विद्या बालन विविध मुद्द्यांवर मोकळेपणे व्यक्त झाली. यावेळी तिने स्पष्ट सांगितलं की, "मी धार्मिक वास्तू उभारण्यासाठी कोणतीही देणगी किंवा दान देणार नाही." यामागचं कारणंही तिने सांगितलं आहे.

धार्मिक वास्तू उभारण्यासाठी देणगी देत नाही; विद्या बालनने सांगितलं कारण
Vidya Balan Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Apr 26, 2024 | 1:56 PM

धर्माच्या बाबतीत भारतीयाचं अधिकाधिक ध्रुवीकरण झालं असून लोक आता अशा कोणत्याही गोष्टीच्या शोधात आहेत, ज्यामुळे त्यांना ओळख प्राप्त होईल, असं मत अभिनेत्री विद्या बालनने मांडलं आहे. या देशाची आधी धार्मिक ओळख नव्हती, पण आता परिस्थिती बदलली आहे, असंही ती म्हणाली. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत विद्या विविध मुद्द्यांवर मोकळेपणे व्यक्त झाली. धर्माच्या बाबतीत देशात ध्रुवीकरण वाढलंय, असं तुला वाटतं का, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर विद्याने तिचं स्पष्ट मत मांडलं.

‘अनफिल्टर्ड बाय समदिश’ला दिलेल्या मुलाखतीत विद्या म्हणाली, “माझ्या मते नक्कीच आपण विभागलो गेलोय. एक राष्ट्र म्हणून आधी आपली धार्मिक ओळख नव्हती. पण आता माहित नाही का.. हे फक्त राजकारणामुळे नाही, सोशल मीडियामुळेही झालंय. कारण आपण सर्वजण या जगात हरवलोय आणि स्वत:ला शोधतोय. खरंतर आपली स्वत:ची अशी ओळख नाहीच. त्यामुळे स्वत:ला जोडण्यासाठी आपण अशा गोष्टींच्या शोधात आहोत. म्हणून असं सर्वकाही झालंय. मग ते धर्म असो किंवा आता डोळे उघडलेले असो. मी हा आहे, मी तो आहे असं लोक म्हणतात. पण तुम्ही नेमकं कोण आहात, हे तुम्हालाही माहित नाही. म्हणूनच तुम्ही अशा गोष्टींकडे झुकताय किंवा जाताय. आपल्या सर्वांना आपलेपणाची भावना खूप गरजेची आहे आणि या जगात सोशल मीडियाच्या प्रसारामुळे आपण आधीपेक्षा जास्त एकटे झालो आहोत. म्हणून वरवरच्या पातळीवर आपण कल्पना आणि संकल्पनांशी सोयीस्करपणे स्वत:ला जोडत आहोत. आज जगाचं ध्रुवीकरण झालं आहे, हे फक्त एका देशापुरतं मर्यादित नाही.”

या मुलाखतीत विद्याने हेसुद्धा स्पष्ट केलं की ती धार्मिक बांधकामांसाठी कधीच दान करत नाही. धार्मिक बांधकामासाठी निधीची मागणी करणाऱ्यांना ती कधीच देणगी देत नाही. याबद्दल बोलताना ती म्हणाली, “त्यापेक्षा मी आरोग्यसेवा, स्वच्छा आणि शिक्षण या क्षेत्रांसाठी निधी देईन. मी स्वत: खूप धार्मिक आहे, मी दररोज पूजा करते. पण मला धार्मिक बांधकामासाठी देणगी द्यावंसं वाटत नाही.”

हे सुद्धा वाचा

जेव्हा विद्याला विचारलं गेलं की तिला परोपकारासाठी कोणत्या क्षेत्रात काम करायला आवडेल? त्यावर तिने सांगितलं, “आरोग्य, स्वच्छता आणि शिक्षण. जर एखादी व्यक्ती माझ्याकडे धार्मिक वास्तू उभारण्यासाठी देणगी मागत असेल, मग ती कोणतीही वास्तू असो.. मी कधीच त्यांना देणगी देत नाही. मी त्यांना म्हणते, जर तुम्ही हॉस्पिटल, शाळा किंवा शौचालय बांधत असाल तर मी आनंदाने योगदान देईन. पण धार्मिक संस्थांना नाही.”

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.