Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bigg Boss OTT 2 | ‘बिग बॉस’च्या घरात पूजा भट्ट वापरते फोन? व्हायरल फोटोवर कमेंट्सचा वर्षाव

'आता तर पुरावाच मिळाला.. हेच बिग बॉसचं सत्य आहे', असं एकाने लिहिलं. तर 'ज्या लोकांना बिग बॉस स्क्रिप्टेड वाटत नाही, त्यांच्यासाठी हा खास पुरावा', असं दुसऱ्या युजरने म्हटलं आहे. या कमेंट्समध्ये अनेकांनी एल्विश यादवच्या वक्तव्याचा उल्लेख केला.

Bigg Boss OTT 2 | 'बिग बॉस'च्या घरात पूजा भट्ट वापरते फोन? व्हायरल फोटोवर कमेंट्सचा वर्षाव
Bigg Boss OTT 2Image Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Aug 09, 2023 | 2:07 PM

मुंबई | 9 ऑगस्ट 2023 : बिग बॉस ओटीटीचा दुसरा सिझन अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. येत्या 14 ऑगस्ट रोजी ग्रँड फिनाले पार पडणार आहे. सहा स्पर्धक अंतिम फेरीपर्यंत पोहोचले आहेत. यामध्ये एल्विश यादव, अभिषेक मल्हान, मनीषा राणी, जिया शंकर, बेबिका धुर्वे आणि पूजा भट्ट यांचा समावेश आहे. पूजा भट्ट, अभिषेक मल्हान आणि एल्विश यादव या तिघांना तगडे स्पर्धक मानलं जात आहे. अभिनेत्री पूजा भट्ट तिच्या खेळीमुळे पहिल्या एपिसोडपासूनच चर्चेत आली. मात्र अनेकदा बिग बॉस आणि सलमानने तिच्यासाठी पक्षपात केल्याचा आरोप केला गेला. यात सर्वांत मोठा आरोप असाही होता की बिग बॉसच्या घरात पूजा मोबाइल फोनचा वापर करते.

सोशल मीडियावर अनेकदा असा दावा करण्यात आला की पूजा भट्टच्या हातात बिग बॉसच्या घरात फोन दिसला. मात्र आता यासंदर्भातील फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये पूजाच्या बाजूलाच मोबाइल फोन पहायला मिळत आहे. याआधीही ऑडीशनच्या टास्कमध्ये तिच्यावर फोन वापरल्याचा आरोप करण्यात आला होता. व्हायरल होत असलेल्या या फोटोमध्ये पूजा आणि बेबिका एकमेकींसमोर बसून गप्पा मारताना दिसत आहेत. बिग बॉसच्या घरातील जिमच्या जवळ असलेल्या सोफ्यावर या दोघी बसल्या आहेत. पूजाच्या बाजूला पाण्याची बॉटल आणि मोबाइल फोन स्पष्ट दिसत आहे.

हे सुद्धा वाचा

पूजा भट्टचा हा फोटो खरा आहे की कोणी मॉर्फ केला आहे, हे मात्र अद्याप स्पष्ट झालं नाही. मात्र या फोटोवर अनेकांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. ‘आता तर पुरावाच मिळाला.. हेच बिग बॉसचं सत्य आहे’, असं एकाने लिहिलं. तर ‘ज्या लोकांना बिग बॉस स्क्रिप्टेड वाटत नाही, त्यांच्यासाठी हा खास पुरावा’, असं दुसऱ्या युजरने म्हटलं आहे. या कमेंट्समध्ये अनेकांनी एल्विश यादवच्या वक्तव्याचा उल्लेख केला. एल्विशने पूजा भट्टवर एकदा बिग बॉसच्या घरात फोन वापरल्याचा आरोप केला होता. याआधी सलमानचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या फोटोमध्ये त्याच्या हातात सिगारेट पहायला मिळाली होती.

बिग बॉस ओटीटीच्या यंदाच्या सिझनमध्ये युट्यूबर्सचं पारडं जड असल्याचं पहायला मिळत आहे. मात्र एल्विश आणि अभिषेकच्या या लढाईत अभिनेत्री पूजा भट्टला कमकुवत स्पर्धक मानणं चुकीचं ठरेल. या दोघांवर मात करत पूजासुद्धा या सिझनची विजेती ठरू शकते. यामागचं कारण म्हणजे पहिल्या दिवसापासून पूजाची खेळी दमदार आहे. अनेकदा खेळादरम्यान स्पर्धकांकडून मर्यादा ओलांडल्या जातात. मात्र पूजा टास्कदरम्यान मर्यादा पाळून खेळताना दिसली.

पहलगाम घटनेच्या निषेधार्थ मालेगाव बंदची हाक
पहलगाम घटनेच्या निषेधार्थ मालेगाव बंदची हाक.
लष्कर-ए-तोयबासाठी काम करणाऱ्या 4 दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्या
लष्कर-ए-तोयबासाठी काम करणाऱ्या 4 दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्या.
हल्ला झालेल्या बैसरन खोऱ्यातून टीव्ही9 चा ग्राउंड रिपोर्ट
हल्ला झालेल्या बैसरन खोऱ्यातून टीव्ही9 चा ग्राउंड रिपोर्ट.
आमच्या भावना, संवेदना सरकार सोबत; पहलगामवर संजय राऊतांची प्रतिक्रिया
आमच्या भावना, संवेदना सरकार सोबत; पहलगामवर संजय राऊतांची प्रतिक्रिया.
शरद पवारांनी घेतलं जगदाळे आणि गणबोटेंच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन
शरद पवारांनी घेतलं जगदाळे आणि गणबोटेंच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन.
पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ आज डोंबिवली बंदची हाक
पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ आज डोंबिवली बंदची हाक.
75 पर्यटकांची पहिली तुकडी एकनाथ शिंदेंसह मुंबईत दाखल
75 पर्यटकांची पहिली तुकडी एकनाथ शिंदेंसह मुंबईत दाखल.
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.