Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रश्मिकाशी साखरपुडा करण्याबाबत अखेर विजय देवरकोंडाने सोडलं मौन; म्हणाला..

येत्या फेब्रुवारी महिन्यात अभिनेता विजय देवरकोंडा आणि अभिनेत्री रश्मिका मंदान हे दोघं साखरपुडा करणार असल्याची जोरदार चर्चा होती. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत विजयने या चर्चांवर मौन सोडलं आहे. रश्मिकाशी साखरपुडा करणार की नाही, याचं त्याने उत्तर दिलं आहे.

रश्मिकाशी साखरपुडा करण्याबाबत अखेर विजय देवरकोंडाने सोडलं मौन; म्हणाला..
Vijay Deverakonda and Rashmika Mandanna
Follow us
| Updated on: Jan 20, 2024 | 8:46 AM

मुंबई : 20 जानेवारी 2024 | अभिनेता विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना या जोडीचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. या दोघांनी काही दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं. त्यानंतर त्यांची ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन केमिस्ट्री सुपरहिट ठरू लागली. विजय आणि रश्मिका एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा गेल्या काही वर्षांपासून आहे. लवकरच हे दोघं साखरपुडा करणार असल्याचंही म्हटलं जात आहे. या साखरपुड्याच्या चर्चांवर आता विजयने मौन सोडलं आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने रश्मिकासोबत साखरपुडा करणार की नाही, या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे.

विजयने या मुलाखतीत साखरपुड्याच्या चर्चांना फेटाळलं आहे. “मी फेब्रुवारीमध्ये लग्न किंवा साखरपुडा करत नाहीये”, असं त्याने स्पष्ट केलं. याविषयी तो पुढे म्हणाला, “मला आता असं वाटू लागलंय की पत्रकारांना दर दोन वर्षांनी माझं लग्न लावायचं असतं. प्रत्येक वर्षी मी या अफवा ऐकतो. ते फक्त माझ्या मागे लागले आहेत की कधी मी त्यांच्या तावडीत सापडतो आणि कधी माझं लग्न होतं.” विजयच्या या उत्तरामुळे साखरपुड्याच्या चर्चांना पूर्णविराम लागला आहे.

हे सुद्धा वाचा

आतापर्यंत रश्मिका आणि विजयने कधीच जाहीरपणे प्रेमाची कबुली दिली नाही. मात्र त्यांची ऑफस्क्रीन केमिस्ट्री आणि सोशल मीडियावरील काही गोष्टींच्या निरीक्षणानंतर चाहत्यांनी दोघांच्या अफेअरची शक्यता व्यक्त केली. इतकंच नव्हे तर रश्मिका आणि विजय लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याचंही म्हटलं गेलं होतं.

‘कॉफी विथ करण’ या चॅट शोमध्ये जेव्हा अनन्या पांडे आणि विजय देवरकोंडा यांनी हजेरी लावली होती, तेव्हा अनन्याने विजय आणि रश्मिकाच्या रिलेशनशिपबद्दल हिंट दिली होती. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत नाव कमावल्यानंतर रश्मिकाने बॉलिवूडकडे आपला मोर्चा वळविला. कमी वयात तिने प्रसिद्धी आणि पैसा दोन्ही कमावलंय. रश्मिकाचा याआधी साखरपुडा झाला होता, हे फार कमी लोकांना माहीत असेल. रश्मिकाने दाक्षिणात्य अभिनेता आणि निर्माता रक्षित शेट्टीशी साखरपुडा केला होता. मात्र 2017 मध्ये या दोघांचा साखरपुडा मोडला. यावर रश्मिकाने कधीच कोणती प्रतिक्रिया दिली नाही.

जळगावात दोन गटात तूफान राडा
जळगावात दोन गटात तूफान राडा.
नितेश राणेंकडून विधानपरिषदेत नार्वेकरांचा मित्र म्हणून उल्लेख
नितेश राणेंकडून विधानपरिषदेत नार्वेकरांचा मित्र म्हणून उल्लेख.
आरोपी गौरव अहुजाचा येरवडामध्ये मुक्काम वाढला
आरोपी गौरव अहुजाचा येरवडामध्ये मुक्काम वाढला.
तृप्ती देसाईंसोबत काय झाली चर्चा? धनंजय देशमुखांनी दिली प्रतिक्रिया
तृप्ती देसाईंसोबत काय झाली चर्चा? धनंजय देशमुखांनी दिली प्रतिक्रिया.
फडणवीसांची औरंगजेबाशी तुलना! 'त्या' वक्तव्यानंतर सपकाळ आता म्हणताय...
फडणवीसांची औरंगजेबाशी तुलना! 'त्या' वक्तव्यानंतर सपकाळ आता म्हणताय....
औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तापलं, बघा कुठं, कसा झाला अंत?
औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तापलं, बघा कुठं, कसा झाला अंत?.
स्वारगेट प्रकरणातील पीडितेनं DCM शिंदेंकडे केली एकच मागणी, म्हणाली...
स्वारगेट प्रकरणातील पीडितेनं DCM शिंदेंकडे केली एकच मागणी, म्हणाली....
'जिसे, निभा ना सकू..', अजितदादांची शायरीतून विरोधकांना टोलेबाजी
'जिसे, निभा ना सकू..', अजितदादांची शायरीतून विरोधकांना टोलेबाजी.
पटोलेंच्या ऑफरवर दादांनी उडवली खिल्ली, 'तुम्ही कशाचा पाठिंबा देताय...'
पटोलेंच्या ऑफरवर दादांनी उडवली खिल्ली, 'तुम्ही कशाचा पाठिंबा देताय...'.
औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण तापलं; बजरंग दलाचं राज्यभरात आंदोलन
औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण तापलं; बजरंग दलाचं राज्यभरात आंदोलन.