Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vijay Deverakonda | विजय देवरकोंडा याच्यासमोर घडला अत्यंत धक्कादायक प्रकार, चाहत्यांमध्ये संतापाची लाट, चक्क सुरक्षारक्षकांनीच

साऊथ स्टार विजय देवरकोंडा हा नेहमीच चर्चेत असतो. विजय देवरकोंडा याची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. विजय देवरकोंडा हा सोशल मीडियावर देखील सक्रिय असतो. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना विजय देवरकोंडा दिसतो.

Vijay Deverakonda | विजय देवरकोंडा याच्यासमोर घडला अत्यंत धक्कादायक प्रकार, चाहत्यांमध्ये संतापाची लाट, चक्क सुरक्षारक्षकांनीच
Follow us
| Updated on: Aug 31, 2023 | 9:02 PM

मुंबई : साऊथ स्टार विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) हा जोरदार चर्चेत आहे. विजय देवरकोंडा याची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. काही दिवसांपूर्वीच विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे यांचा लाईगर हा चित्रपट (Movie) रिलीज झाला. विशेष म्हणजे या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे हे दिसले. चित्रपटासाठी आयोजित केलेल्या एका शोमध्ये जाण्यासाठी उशीर होत असल्याने अनन्या पांडे आणि विजय देवरकोंडा हे लोकलने प्रवास करताना दिसले. ज्याचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले.

विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे यांचा लाईगर हा चित्रपट धमाका करेल असे सांगितले जात होते. मात्र, विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे यांचा हा चित्रपट फ्लाॅप गेला. या चित्रपटाकडून सर्वांनाच मोठ्या अपेक्षा या नक्कीच होत्या. अनन्या पांडे आणि विजय देवरकोंडा यांचा हा चित्रपट अत्यंत बिग बजेटचा चित्रपट होता. मात्र, याला धमाल करण्यात यश मिळाले नाही.

मुळात म्हणजे लाईगर चित्रपटाच्या अपयशाचे खापर हे अनन्या पांडे हिच्यावर फोडण्यात आले. सध्या विजय देवरकोंडा हा त्याच्या आगामी चित्रपटामुळे जोरदार चर्चेत आहे. विजय देवरकोंडा याचा कुशी हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाचे प्रमोशन करताना देखील विजय देवरकोंडा हा दिसत आहे. नुकताच एक धक्कादायक प्रकार घडला आहे.

एका कार्यक्रमात विजय देवरकोंडा हा कुशी चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी पोहचला. त्यावेळी विजय देवरकोंडा याच्यासोबत एक चाहता फोटो काढण्यासाठी स्टेजवर आला. मात्र, या चाहत्याला चक्क धक्के देत त्याच्या सुरक्षारक्षकांनी स्टेजच्या खाली हाकलून दिले. आता हाच व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे.

मुळात म्हणजे जवळपास एका महिन्यापूर्वीच चित्रपटाचे प्रमोशन विजय देवरकोंडा हा करत असताना एक चाहता विजय देवरकोंडाच्या पाया पडण्यासाठी स्टेजवर आला. मात्र, यानंतर घाबरून चक्क विजय देवरकोंडा हा पळताना दिसला. विजय देवरकोंडा याचा हा व्हिडीओ पाहून अनेकांनी मोठा धक्का बसला होता. अभिनेत्याने असे का केले असा प्रश्न उपस्थित होत होता.

आता या चाहत्याला विजय देवरकोंडा याच्या सुरक्षारक्षकांनी धक्के देऊन हाकलून दिल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसलाय. विशेष म्हणजे ज्यावेळी या चाहत्याला धक्के देऊन स्टेजवरून खाली हाकलले जात होते. त्यावेळी हा सर्व प्रकार विजय देवरकोंडा हा बघत होता. यानंतर आता विजय देवरकोंडा याला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे.

जळगावात दोन गटात तूफान राडा
जळगावात दोन गटात तूफान राडा.
नितेश राणेंकडून विधानपरिषदेत नार्वेकरांचा मित्र म्हणून उल्लेख
नितेश राणेंकडून विधानपरिषदेत नार्वेकरांचा मित्र म्हणून उल्लेख.
आरोपी गौरव अहुजाचा येरवडामध्ये मुक्काम वाढला
आरोपी गौरव अहुजाचा येरवडामध्ये मुक्काम वाढला.
तृप्ती देसाईंसोबत काय झाली चर्चा? धनंजय देशमुखांनी दिली प्रतिक्रिया
तृप्ती देसाईंसोबत काय झाली चर्चा? धनंजय देशमुखांनी दिली प्रतिक्रिया.
फडणवीसांची औरंगजेबाशी तुलना! 'त्या' वक्तव्यानंतर सपकाळ आता म्हणताय...
फडणवीसांची औरंगजेबाशी तुलना! 'त्या' वक्तव्यानंतर सपकाळ आता म्हणताय....
औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तापलं, बघा कुठं, कसा झाला अंत?
औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तापलं, बघा कुठं, कसा झाला अंत?.
स्वारगेट प्रकरणातील पीडितेनं DCM शिंदेंकडे केली एकच मागणी, म्हणाली...
स्वारगेट प्रकरणातील पीडितेनं DCM शिंदेंकडे केली एकच मागणी, म्हणाली....
'जिसे, निभा ना सकू..', अजितदादांची शायरीतून विरोधकांना टोलेबाजी
'जिसे, निभा ना सकू..', अजितदादांची शायरीतून विरोधकांना टोलेबाजी.
पटोलेंच्या ऑफरवर दादांनी उडवली खिल्ली, 'तुम्ही कशाचा पाठिंबा देताय...'
पटोलेंच्या ऑफरवर दादांनी उडवली खिल्ली, 'तुम्ही कशाचा पाठिंबा देताय...'.
औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण तापलं; बजरंग दलाचं राज्यभरात आंदोलन
औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण तापलं; बजरंग दलाचं राज्यभरात आंदोलन.