Vijay Deverakonda: विजय देवरकोंडाच्या निमित्ताने टॉलिवूड-बॉलिवूड येणार एकत्र; संपूर्ण भारताचा स्टार होण्यासाठी अभिनेता सज्ज

तेलुगू चित्रपटांमध्ये विजयने (Vijay Deverakonda) आधीच आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. आता तो करण जोहरच्या 'लायगर'मध्ये मुख्य भूमिकेत झळकणार आहे. यामध्ये त्याच्यासोबत अभिनेत्री अनन्या पांडे मुख्य भूमिकेत आहे.

Vijay Deverakonda: विजय देवरकोंडाच्या निमित्ताने टॉलिवूड-बॉलिवूड येणार एकत्र; संपूर्ण भारताचा स्टार होण्यासाठी अभिनेता सज्ज
Vijay Deverakonda's Liger Image Credit source: Twitter
Follow us
| Updated on: May 09, 2022 | 4:12 PM

टॉलिवूडसोबतच बॉलिवूडवरही आपल्या दमदार अभिनयकौशल्याची छाप स़ोडण्यासाठी सज्ज झालेला अभिनेता विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) याच्या ‘लायगर’ (Liger) या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला. विजयच्या वाढदिवसाच्या एक दिवस आधीच टीझर प्रदर्शित करत त्याने चाहत्यांना भेट दिली. या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच टॉलिवूड आणि बॉलिवूड एकत्र येत आहेत. ‘भारतासमोर आमचा प्रोजेक्ट आणण्यासाठी आम्ही संयमाने वाट पाहत होतो. मला भूक आहे आणि आता भारतसुद्धा भुकेलेला आहे. त्याला मुक्त करण्याची वेळ आली आहे’, असं ट्विट विजयने केलं. आतापर्यंत विजय फक्त दाक्षिणात्य प्रेक्षकांपुरता मर्यादित होता. मात्र आता ‘लायगर’च्या निमित्ताने तो ‘पॅन इंडिया स्टार’ बनण्यासाठी सज्ज झाला आहे. ‘लायगर’च्या टीझरने या चित्रपटाविषयीची उत्सुकता आणखी वाढवली आहे.

तेलुगू चित्रपटांमध्ये विजयने आधीच आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. आता तो करण जोहरच्या ‘लायगर’मध्ये मुख्य भूमिकेत झळकणार आहे. यामध्ये त्याच्यासोबत अभिनेत्री अनन्या पांडे मुख्य भूमिकेत आहे. इंडस्ट्रीतील हा सर्वांत मोठा अॅक्शन चित्रपट असेल असं म्हटलं जातंय. या चित्रपटातील अॅक्शन सीक्वेन्ससाठी विजयने खूप मेहनत घेतली आहे. या चित्रपटात विजय आणि अनन्यासोबत माजी प्रोफेशनल बॉक्सर माइक टायसनसुद्धा झळकणार आहे.

हे सुद्धा वाचा

विजयचं ट्विट-

येत्या ऑगस्ट महिन्यात हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विजय आणि लायगर या चित्रपटाच्या निमित्ताने दाक्षिणात्य सिनेमे आणि बॉलिवूड यांच्यातील सहयोगाची परिभाषा नव्याने मांडली जाणार आहे. विजयचा हा पहिलाच बॉलिवूड चित्रपट असला तरी बॉलिवूड प्रेक्षकांसाठी तो काही नवा कलाकार नाही. ‘कबीर सिंग’ या चित्रपटाच्या यशामुळे देशभरात त्याला प्रसिद्धी मिळाली. ‘अर्जुन रेड्डी’ या विजयच्या तेलुगू चित्रपटाचा हा हिंदी रिमेक होता. ज्यामध्ये शाहिद कपूर आणि कियारा अडवाणी यांच्या मुख्य भूमिका होत्या.

विजयचं ट्विट-

अभिनयाव्यतिरिक्त विजयचं सामाजिक क्षेत्रातील कामसुद्धा नेहमीच चर्चेत असतं. तळागाळातील लोकांचं जीवन सुधारण्याचा विचार झाला तरच त्याच अर्थ व्यवसाय होतो, असं त्याचं म्हणणं आहे. पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावरही त्याने बरंच काम केलंय. विजयने एप्रिल 2019 मध्ये ‘द देवरकोंडा फाऊंडेशन’ या ना नफा संस्थेची स्थापना केली. कोविड महामारीच्या संकटादरम्यान प्रभावित झालेल्या मध्यमवर्गीय कुटुंबांची मदत करण्याच्या उद्देशाने मध्यमवर्गीय निधीची स्थापना करण्यात आली. या निधीतून बाधित कुटुंबांना मूलभूत किराणा सामान आणि आवश्यक अन्नपदार्थ खरेदी करण्यास मदत करण्यात आली होती.

ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...