Kareena Kapoor | ‘मेरे तो पसीने छूट गए…’, करीना कपूर हिच्यासोबत रोमाँटिक सीनवर विजय वर्माने सोडलं मौन

Kareena Kapoor | ओटीटी प्लॅटफॉर्मवर रंगणार करीना कपूर - विजय वर्मा यांचा रोमान्स... करीना कपूर हिच्यासोबत रोमाँटिक सीनवर अभिनेता म्हणाला, 'मेरे तो पसीने छूट गए...' , करीना कपूर हिचं ओटीटी प्लॅटफॉर्मवर दमदार पदार्पण... तर दुसरीकडे विजय वर्मा याच्या वक्तव्याची चर्चा...

Kareena Kapoor | 'मेरे तो पसीने छूट गए...', करीना कपूर हिच्यासोबत रोमाँटिक सीनवर विजय वर्माने सोडलं मौन
Follow us
| Updated on: Sep 19, 2023 | 10:58 AM

मुंबई : 19 सप्टेंबर 2023 | अभिनेत्री करीना कपूर हिने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींच्या यादीत करीना अव्वल स्थानी आहे. पण आता करीना हिने स्वतःचा मोर्चा ओटीटी प्लॅटफॉर्मच्या दिशेने वळवला आहे. अभिनेत्री ‘जानेजान’ सिनेमाच्या माध्यमातून ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करणार आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त करीना कपूर स्टारर ‘जानेजान’ सिनेमाची चर्चा रंगली आहे. सिनेमात अभिनेत्रीसोबत अभिनेता विजय वर्मा महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. करीना कपूर आणि विजय वर्मा स्टारर ‘जाने जान’ सिनेमा २१ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे २१ सप्टेंबरला अभिनेत्रीचा वाढदिवस आहे. करीना वाढदिवसाचं निमित्तसाधत ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करणार आहे.

‘जानेजान’ सिनेमामध्ये करिनासोबत विजय वर्मा आणि जयदीप अहलीवत मुख्य भूमिकेतून चाहत्यांच्या भेटीस येणार आहेत. सिनेमात करीना आणि विजय यांच्यावर एक रोमाँटिक सीन चित्रित करण्यात आला आहे. नुकताच झालेल्या मुलाखतीत विजय वर्मा याने करीना हिच्या रोमाँटिक सीन शुट करताना आलेल्या अनुभवाबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्याच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.

नुकताच झालेल्या एका मुलाखतीत अभिनेता म्हणला, ‘सिनेमात एक सीन असा आहे, ज्यामध्ये करीना माझ्याकडे एका वेगळ्या अंदाजात पाहत आहे आणि गाणी गात आहे. जेव्हा रोमाँटिक सीन येतो, मनात दडपण होतं..’ विजय म्हणाला, ‘मेरे तो पसीने छूट गए’, जेव्हा करीना परफॉर्म करते तेव्हा प्रचंड सुरंद दिसते. तिला माहिती आहे, तिच्याकडे खास अदा आहेत… सध्या सर्वत्र दोघांच्या रोमाँटिक सीनची चर्चा रंगली आहे.

नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार ‘जानेजान’ सिनेमा

करीना कपूर आणि विजय वर्मा स्टारर ‘जाने जान’ सिनेमा २१ सप्टेंबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. सिनेमात प्रेक्षकांना विजय आणि करीना यांच्यातील केमिस्ट्री अनुभवता येणार आहे. चाहते देखील सिनेमाच्या प्रतीक्षेत आहेत. सिनेमाचं दिग्दर्शिन सुजॉय घोष यांनी केलं आहे. सध्या अभिनेत्री सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

करीना कपूर हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर देखील करीना हिच्याबद्दल अनेक चर्चा रंगलेल्या असतात. सोशल मीडियावर करीना हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.