विजय वर्माचा फोटो आणि त्यावर लिहिलंय RIP, चाहत्यांना बसला मोठा धक्का

Vijay Varma Instagram Post: सोशल मीडियावर अभिनेता विजय वर्मा याचा हैराण करणारा फोटो होतोय तुफान व्हायरल, फोटोवर लिहिलंय RIP, चाहत्यांना बसला मोठा धक्का..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त विजय वर्मा याच्या पोस्टची चर्चा...

विजय वर्माचा फोटो आणि त्यावर लिहिलंय RIP, चाहत्यांना बसला मोठा धक्का
Follow us
| Updated on: Aug 07, 2024 | 8:08 AM

गेल्या काही दिवसांमध्ये अभिनेता विजय वर्मा याने अनेक सिनेमे आणि सीरिजमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. अभिनेत्याच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. त्यामुळे विजय बद्दल जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. पण आता विजय वर्माच्या चाहत्यांना मोठा धक्का लागला आहे. विजय वर्माच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर करण्यात आला आहे. फोटो शेअर करत त्यावर RIP असं लिहिलं आहे. त्यामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. फोटो मागचं कारण देखील अभिनेत्याने कॅप्शनमध्ये सांगितलं आहे.

सांगायचं झालं तर, दोन वर्षांपूर्वी विजय वर्माचा एक सिनेमा नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता. सिनेमात अभिनेत्याने हमजा शेख ही भूमिका साकारली होती. तर अभिनेत्री आलिया भट्ट हिने पत्नी बदरुनिस्सा ‘बदरु’ ही भूमिका साकारली होती. सिनेमाचं नाव ‘डार्लिंग्स’ होतं. सिनेमाचं सर्व स्तरातून कौतुक झालं.

View this post on Instagram

A post shared by Vijay Varma (@itsvijayvarma)

सिनेमात हमजा (विजय) सतत स्वतःच्या पत्नीचा छळ करायचा. सतत पत्नीला मारहाण करायचा. त्यामुळे सतत होणाऱ्या पतीच्या जाचाला कंटाळून बदरु (आलिया) हिने आईच्या मदतीने पतीची हत्या केली. सिनेमात आलियाच्या आईची भूमिका अभिनेत्री शेफाली शाह हिने साकारली होती.

सिनेमात हमजा शेख या भूमिकेचा अंत झाला होता. त्यामुळे दोन वर्षांनंतर हमजा शेख याचा पोस्ट करत विजय वर्मा याने RIP असं लिहिलं आहे. पण विजय वर्माची पोस्ट पाहिल्यानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला. त्यामुळे अभिनेत्याने कमेंटमध्ये चाहत्यांची माफी मागितली. ‘मला माफ करा मित्रांनो… तुम्हाला घबरवण्याचा माझा कोणताच हेतू नव्हता. सिनेमातील एक स्क्रिन शॉट आहे. डार्क कॉमेडी म्हणून पोस्ट शेअर केली.’ असं अभिनेता म्हणाला.

विजय वर्मा याने फोटोमागचं कारण सांगितल्यानंतर चाहत्यांनी देखील मोकळा श्वास घेतला. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘मी तर पूर्णपणे घाबरली होती…’, दुसरा नेटकरी म्हणाला, ‘एक मिनिटासाठी मी सत्य मानलं होतं’, अन्य एक नेटकरी म्हणाला, ‘असं पुन्हा करु नको…’ , सध्या अभिनेत्याची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?.
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?.
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप.
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.