पब्लिसिटी स्टंट की खरं प्रेम; विजय वर्माने सांगितलं तमन्ना भाटियासोबतच्या नात्याचं सत्य

33 वर्षीय तमन्नाने 2005 मध्ये ‘चांद सा रोशन चेहरा’ या चित्रपटातून करिअरची सुरुवात केली. तेलुगू आणि तमिळ चित्रपटसृष्टीतील ती यशस्वी आणि लोकप्रिय अभिनेत्री आहे. ‘बाहुबली’ या चित्रपटात तिने मुख्य भूमिका साकारली होती.

पब्लिसिटी स्टंट की खरं प्रेम; विजय वर्माने सांगितलं तमन्ना भाटियासोबतच्या नात्याचं सत्य
तमन्ना भाटिया, विजय वर्माImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jul 16, 2023 | 12:51 PM

मुंबई | 16 जुलै 2023 : बॉलिवूड असो किंवा साऊथ.. इंडस्ट्री कोणतीही असली तर नाती प्रत्येकठिकाणी बनतात आणि बिघडतातही. नव्या नात्यांची इंडस्ट्रीत आणि सोशल मीडियावर जोरदार चर्चा होते. अशीच एक जोडी सध्या चर्चेत आहे, ती म्हणजे अभिनेता विजय वर्मा आणि तमन्ना भाटियाची. ‘लस्ट स्टोरीज 2’मध्ये ही नवी जोडी एकत्र झळकली. या सीरिजसाठी तमन्नाने तिचा बऱ्याच वर्षांपासूनचा ‘नो किसिंग’ नियम मोडला. मात्र या दोघांच्या नात्याची चर्चा फक्त एक पब्लिसिटी स्टंट होता का, असा सवाल काहींनी उपस्थित केला. त्यावर आता खुद्द विजय वर्माने उत्तर दिलं आहे.

2023 या वर्षाच्या सुरुवातीपासूनच तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा यांच्या रिलेशनशिपच्या चर्चांना उधाण आलं. नवीन वर्षाच्या सुरुवातीच्या पार्टीत या दोघांना एकमेकांना किस करताना पाहिलं गेलं होतं. गोव्यातील दोघांचा फोटो व्हायरल झाला होता. यानंतरही अनेकदा दोघांना एकत्र पाहिलं गेलं. काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत तमन्नाने तिच्या प्रेमाची जाहीर कबुली दिली. ‘लस्ट स्टोरीज 2’च्या सेटवर दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. आता विजय वर्माने ‘पब्लिसिटी स्टंट’च्या कमेंट्सवर प्रतिक्रिया दिली आहे.

हे सुद्धा वाचा

जीक्यू इंडियाला दिलेल्या मुलाखतीत विजय वर्मा म्हणाला, “आम्ही दोघं एकमेकांना डेट करतोय. दोघं एकमेकांसोबत खूप खुश आहोत. मी तिच्या प्रेमात अक्षरश: वेडा आहे. माझ्या आयुष्यातील ‘विलेन’चा टप्पा आता संपलेला आहे, आता मी रोमान्सच्या टप्प्यात आहे.”

View this post on Instagram

A post shared by Netflix India (@netflix_in)

याआधी ‘फिल्म कम्पॅनियन’ला दिलेल्या मुलाखतीत तमन्ना विजयबद्दल म्हणाली होती, “मला वाटत नाही की तुम्ही एखाद्याकडे यासाठी आकर्षित होऊ शकता कारण तो तुमचा सहकलाकार आहे. माझे अनेक सहकलाकार होते. माझ्या मते एखाद्याच्या प्रेमात पडणं किंवा एखाद्यासाठी मनात काही भावना येणं ही नक्कीच अत्यंत वैयक्तीत बाब आहे. ते काय काम करतात, याच्याशी त्याचं काहीच घेणं-देणं नाही. एखाद्याची नोकरी किंवा व्यवसाय पाहून प्रेम केलं जात नाही.”

33 वर्षीय तमन्नाने 2005 मध्ये ‘चांद सा रोशन चेहरा’ या चित्रपटातून करिअरची सुरुवात केली. तेलुगू आणि तमिळ चित्रपटसृष्टीतील ती यशस्वी आणि लोकप्रिय अभिनेत्री आहे. ‘बाहुबली’ या चित्रपटात तिने मुख्य भूमिका साकारली होती. तर 36 वर्षीय विजयने 2012 मध्ये ‘चटगांव’ या चित्रपटातून कारकिर्दीची सुरुवात केली. गली बॉय या चित्रपटातून त्याला लोकप्रियता मिळाली.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.