Vikram Gokhale: विक्रम गोखलेंची प्रकृती चिंताजनक; मेडीकल बुलेटिनमध्ये दिली महत्त्वूपर्ण माहिती
विक्रम गोखलेंच्या प्रकृतीविषयी फॅमिली फ्रेंड राजेश दामले यांनी दिली मोठी अपडेट
पुणे: ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या प्रकृतीविषयीचे महत्त्वाचे अपडेट्स मेडिकल बुलेटिनद्वारे देण्यात आले आहेत. गेल्या 24 तासांपासून त्यांची प्रकृती अत्यंत नाजूक आहे. उपचाराला म्हणावा तसा प्रतिसाद त्यांचं शरीर देत नाहीये. आम्ही प्रयत्न करतोय, असं डॉक्टरांनी सांगितलं आहे. जोपर्यंत डॉक्टर काही सांगत नाहीत, तोपर्यंत पुढे काही सांगू शकत नाही, असं गोखले यांचे फॅमिली फ्रेंड राजेश दामले म्हणाले.
विक्रम गोखले यांचं मल्टिपल ऑर्गन फेल्युअर झाल्याचीही माहिती त्यांनी दिली. त्याचप्रमाणे कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. जोपर्यत डॉक्टर सांगत नाहीत तोपर्यंत कुठलीही अफवा पसरवू नका, अशी विनंती दामलेंनी केली.
Pune, Maharashtra | Seasoned actor #VikramGokhale‘s condition is very critical. He is fighting since the last 24 hours. He has suffered multiple organ failure. Doctors are trying their level best: Rajesh Damle, a family friend of the veteran actor pic.twitter.com/1J4Xy5SMxJ
— ANI (@ANI) November 24, 2022
विक्रम गोखले यांना 5 नोव्हेंबरपासून पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. बुधवारपासून त्यांची तब्येत खालावली. “बुधवारी दुपारी ते कोमात गेले आणि तेव्हापासून ते स्पर्शाला प्रतिसाद देत नाहीयेत. पुढे काय करायचं हे डॉक्टर ठरवतील. त्यांची प्रकृती सुधारतेय का, ते प्रतिसाद देत आहेत का, यावरून डॉक्टर पुढील निर्णय घेतील”, अशी माहिती त्यांची पत्नी वृषाली गोखले यांनी दिली होती.
बुधवारी संध्याकाळपासूनच त्यांच्या निधनाच्या अफवा सोशल मीडियावर पसरू लागल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीविषयी कोणत्याच अफवा पसरवू नका आणि त्यावर विश्वास ठेवू नका, अशी विनंती राजेश दामले यांनी केली.