Vikram Gokhale: विक्रम गोखले यांची शेवटची वेब सीरिज अपूर्णच राहणार? निर्मात्यांनी घेतला मोठा निर्णय

'आंबेडकर: द लेजंड'मध्ये विक्रम गोखले बाबासाहेब आंबेडकरांच्या भूमिकेत; सीरिजचं भवितव्य अंधारात

Vikram Gokhale: विक्रम गोखले यांची शेवटची वेब सीरिज अपूर्णच राहणार? निर्मात्यांनी घेतला मोठा निर्णय
Vikram Gokhale: विक्रम गोखले यांची शेवटची वेब सीरिज अपूर्णच राहणार? Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Dec 02, 2022 | 1:11 PM

मुंबई: ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी 26 नोव्हेंबर रोजी अखेरचा श्वास घेतला. ते 77 वर्षांचे होते. रंगभूमी, चित्रपट, टेलिव्हिजन अशा तिन्ही व्यासपीठांवर त्यांनी दमदार कामगिरी केली होती. आजारपणाच्या आधी ते एका वेब सीरिजचं शूटिंग करत होते. या वेब सीरिजचं अर्धच शूटिंग झालं होतं. आता विक्रम गोखलेंच्या निधनानंतर निर्मात्यांनी ती सीरिज बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. विक्रम गोखले यांच्याशिवाय ती सीरिज पूर्ण करायची इच्छा नाही, असं दिग्दर्शकांनी स्पष्ट केलं.

विक्रम गोखलेंची अखेरची वेब सीरिज अपूर्णच राहणार?

‘आंबेडकर: द लेजंड’ या वेब सीरिजमध्ये विक्रम गोखले मुख्य भूमिका साकारत होते. या सीरिजच्या दोन एपिसोडचं शूटिंग पूर्ण झालं होतं. मात्र गोखलेंच्या निधनानंतर सीरिजचं काम अपूर्णच राहणार असल्याचं दिग्दर्शक संजीव जायस्वाल म्हणाले.

लखनऊमध्ये होणार होतं शूटिंग

“मला या प्रोजेक्टला रद्द करावं लागेल, कारण विक्रमजींशिवाय, ज्यांनी त्यात मुख्य भूमिका साकारली, मला हे अशक्य वाटतंय. दुसरा पर्याय असा आहे की या सीरिजचं शूटिंग मला नव्याने करावं लागेल आणि ते निश्चितच अधिक कठीण आहे. विक्रम गोखले यांनी गेल्या वर्षी जवळपास दोन एपिसोडचं शूटिंग पूर्ण केलं होतं. बाकीच्या शूटिंगसाठी आम्हाला लखनऊमध्ये सेट उभारायचा होता”, अशा माहिती दिग्दर्शकांनी दिली.

हे सुद्धा वाचा

स्क्रीप्ट वाचून खूश झाले होते विक्रम गोखले

“विक्रम सरांसोबत माझा पहिला प्रोजेक्ट लखनऊमध्ये होता. त्यात त्यांनी एका प्रोफेसरची भूमिका साकारली होती. जेव्हा मी बाबासाहेबांच्या सीरिजची स्क्रिप्ट त्यांना वाचून दाखवली, तेव्हा ते खूप खूश झाले होते. त्यावर आम्ही लगेच काम सुरू केलं होतं”, असंही त्यांनी पुढे सांगितलं.

संजीव आणि विक्रम गोखले यांचा शेवटचा संवाद हा मार्च महिन्यात झाला होता. सीरिजच्या काही शूटिंगनंतर ते आजारी पडले. त्यानंतर प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना शूटिंगची परवानगी मिळत नव्हती. या प्रोजेक्टसाठी ते खूप उत्साही होते, मात्र ती सीरिज आता त्यांच्याशिवाय पूर्ण होऊ शकणार नाही.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.