पंधरा दिवसांपर्यंत लोक मजा घेत होते.. सुशांतच्या निधनाबद्दल अभिनेता व्यक्त

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनाबद्दल अभिनेत्री विक्रांत मेस्सी पहिल्यांदाच मोकळेपणे व्यक्त झाला. त्याच्या निधनानंतर ज्याप्रकारे मीडिया ट्रायल झाला, त्याविषयी त्याने चिंता व्यक्त केली. त्याचप्रमाणे बॉलिवूडला मी एक कुटुंब म्हणू शकत नाही, असंही त्याने स्पष्ट केलं.

पंधरा दिवसांपर्यंत लोक मजा घेत होते.. सुशांतच्या निधनाबद्दल अभिनेता व्यक्त
Vikrant Massey and Sushant Singh RajputImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Dec 20, 2023 | 8:49 AM

मुंबई : 20 डिसेंबर 2023 | अभिनेता विक्रांत मेस्सी सध्या ‘बारवीं फेल’ या चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. विधू विनोद चोप्रा दिग्दर्शित या चित्रपटाचं प्रेक्षक-समीक्षकांकडून खूप कौतुक झालं. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत विक्रांत फिल्म इंडस्ट्रीबद्दल मोकळेपणे व्यक्त झाला. यावेळी त्याने अभिनेता सुशांत सिंह राजपूतचं निधन आणि त्यानंतर सोशल मीडियावर झालेली चर्चा, मीडिया ट्रायल याबाबतही प्रतिक्रिया दिली. सुशांतच्या आत्महत्येनंतर ज्याप्रकारे लोक प्रतिक्रिया देऊ लागले होते, ते सर्व अत्यंत त्रासदायक असल्याचं विक्रांत म्हणाला. जून 2020 मध्ये सुशांत मुंबईतल्या राहत्या घरी मृतावस्थेत आढळला होता. याप्रकरणी पोलिसांच्या तपासादरम्यान अनेक गोष्टी समोर आल्या होत्या. सुशांतच्या निधनाने संपूर्ण कलाविश्वाला जोरदार धक्का बसला होता. मानसिक स्वास्थ्य, इंडस्ट्रीतील घराणेशाही, गटबाजी यावरून विविध चर्चा होऊ लागल्या होत्या.

मीडिया ट्रायलविषयी काय म्हणाला?

नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत विक्रांतला त्याच्या वयातील कलाकारांच्या आत्महत्येबद्दल प्रश्न विचारण्याला आला. त्यावर उत्तर देताना विक्रांत म्हणाला, “विशेषकरून मला सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर खूप त्रास झाला. जो काही मीडिया ट्रायल झाला आणि लोकांनी प्रतिक्रिया दिल्या, ते सर्व पाहून मी खूप निराश झालो होतो. सुशांतच्या निधनानंतर काही लोकांनी खरंच दु:ख आणि सहवेदना व्यक्त केल्या. मात्र ही अत्यंत निराशाजनक गोष्ट आहे की दुसऱ्या बाजूला त्याचा मृत्यू हा मोठ्या मीडिया ट्रायलचा विषय बनला होता. वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर नवनवीन कथा सांगितल्या जाऊ लागल्या होत्या. लोकांकडून वेगवेगळे अंदाज वर्तवले जाऊ लागले होते. त्याचं खासगी आयुष्य, रिलेशनशिप, व्यावसायिक स्ट्रगल यावरून लोकं सार्वजनिकरित्या चर्चा करू लागले होते.”

“लोकांनी खूप मजा घेतली”

विक्रांत याविषयी पुढे म्हणाला, “हे सर्व जवळपास 45 दिवसांपर्यंत चालू होतं. सुरुवातीच्या 15 दिवसांत लोकांनी त्यावरून खूप मजा घेतली. मला असं वाटतं वास्तवात आपण असेच आहोत. आपल्या वास्तविकतेचा हा एक भाग आहे आणि हे प्रचंड मन दुखावणारं आहे. मी आणि सुशांतने छोट्या पडद्यावर एकाच वेळी कामाला सुरुवात केली होती. सुशांत जेव्हा पवित्र रिश्ता मालिकेत काम करत होता, तेव्हा मी बालिका वधूमध्ये भूमिका साकारत होतो.”

हे सुद्धा वाचा

“बॉलिवूड एक कुटुंब नाहीच”

सुशांतच्या निधनानंतर ज्याप्रकारे काही बॉलिवूड सेलिब्रिटींनी मौन बाळगलं, त्यावरही विक्रांतने आपलं मत मांडलं. विक्रांतला विचारलं गेलं की जे लोक याप्रकरणी बोलू शकत होते, एकत्र येऊ शकत होते तेसुद्धा अचानक गप्प झाले. बॉलिवूड एक युनिट म्हणून काम करत नाही का? त्याचं उत्तर देताना विक्रांत म्हणाला, “याच कारणामुळे मी बॉलिवूडला एक कुटुंब म्हणू शकत नाही. हा एक समुदाय आहे, पण परिवार नाही.”

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.