Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Virajas Shivani Wedding: शिवानीच्या हातावर रंगली विराजच्या नावाची मेहंदी; पहा खास Video

शिवानीच्या (Shivani Rangole) हातावर विराजसच्या (Virajas) नावाची मेहंदी रंगली असून या कार्यक्रमाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. शिवानीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर मेहंदीच्या कार्यक्रमाचे व्हिडीओ पोस्ट केले आहेत.

Virajas Shivani Wedding: शिवानीच्या हातावर रंगली विराजच्या नावाची मेहंदी; पहा खास Video
Shivani RangoleImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: May 02, 2022 | 9:09 AM

अभिनेता विराजस कुलकर्णी (Virajas Kulkarni) आणि अभिनेत्री शिवानी रांगोळे (Shivani Rangole) लवकरच लग्नबंधनात अडकणार असून नुकताच मेहंदीचा (Mehendi) कार्यक्रम पार पडला. शिवानीच्या हातावर विराजसच्या नावाची मेहंदी रंगली असून या कार्यक्रमाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. शिवानीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर मेहंदीच्या कार्यक्रमाचे व्हिडीओ पोस्ट केले आहेत. विराजस आणि शिवानीवर सध्या चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होतोय. मेहंदीच्या कार्यक्रमात शिवानीने हिरव्या रंगाचा ड्रेस परिधान करून त्यावर फुलांचे दागिने परिधान केले आहेत. तिच्या या लूकवर अनेकांनी कमेंट्स करत तिचं कौतुक केलं आहे. काही महिन्यांपूर्वीच विराजस आणि शिवानीने सोशल मीडियावर रिलेशनशिपची जाहीर कबुली दिली होती. मराठी टीव्ही इंडस्ट्रीतील ही लोकप्रिय जोडी गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत.

विराजस आणि शिवानी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एकमेकांसोबतचे फोटो नेहमीच शेअर करतात. मात्र सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर यांच्या लग्नसोहळ्याला जेव्हा दोघांनी एकाच रंगसंगतीचे कपडे परिधान करत एकत्र हजेरी लावली, तेव्हापासून या दोघांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या. या चर्चांवर तसं दोघांनी स्पष्टपणे होकार किंवा नकारही दिला नव्हता. मात्र काही महिन्यांपूर्वीच हातातील अंगठीचा फोटो पोस्ट करत शिवानीने विराजसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचं जाहीर केलं होतं.

हे सुद्धा वाचा

पहा व्हिडीओ-

काही दिवसांपूर्वीच शिवानीची खास मैत्रीण सानिया हिने विराजस आणि शिवानीचं केळवण केलं. लग्नाच्या तयारीची खरी सुरुवात ही केळवणापासूनच होते. या केळवणाचे फोटोसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. विराजस हा अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचा मुलगा आहे. ‘माझा होशील ना’ या मालिकेतील त्याची भूमिका चांगलीच गाजली होती. तर शिवानीने ‘बन मस्का’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली. विराजस हा लेखक आणि दिग्दर्शकसुद्धा आहे. त्याने हॉस्टेल डेज या चित्रपटातही काम केलं होतं.

धैर्यशील मानेंच्या त्या विधानावर महायुतीच्या नेत्यांच्या संमिश्र भावना
धैर्यशील मानेंच्या त्या विधानावर महायुतीच्या नेत्यांच्या संमिश्र भावना.
राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या निकालावर एमपीएससीचे विद्यार्थी नाराज
राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या निकालावर एमपीएससीचे विद्यार्थी नाराज.
गुणरत्न सदवार्तेंची पुन्हा मनसेवर टीका
गुणरत्न सदवार्तेंची पुन्हा मनसेवर टीका.
अजितदादांनी वास्तव भूमिका मांडली - अशोक चव्हाण
अजितदादांनी वास्तव भूमिका मांडली - अशोक चव्हाण.
संभाजीनगरच्या किराडपुरा भागात मुस्लिम बांधवांनी दिला एकोप्याचा संदेश
संभाजीनगरच्या किराडपुरा भागात मुस्लिम बांधवांनी दिला एकोप्याचा संदेश.
वक्फच्या जमिनी आपल्या मित्रांना द्यायच्या आहेत, ठाकरेंचा भाजपवर आरोप
वक्फच्या जमिनी आपल्या मित्रांना द्यायच्या आहेत, ठाकरेंचा भाजपवर आरोप.
आमची दारं त्यांच्यासाठी कायम उघडी..; संजय शिरसाटांची खैरेंना ऑफर
आमची दारं त्यांच्यासाठी कायम उघडी..; संजय शिरसाटांची खैरेंना ऑफर.
कितीही जवळचा असला तरी मकोका लावायला सांगेल..
कितीही जवळचा असला तरी मकोका लावायला सांगेल...
कोकाटेंची मुक्ताफळं, अजितदादा अनभिज्ञ, कॉंग्रेसची टीका
कोकाटेंची मुक्ताफळं, अजितदादा अनभिज्ञ, कॉंग्रेसची टीका.
'बर्फाच्या लादीवर झोपवून मारू', एकनाथ शिंदेंचा टोला
'बर्फाच्या लादीवर झोपवून मारू', एकनाथ शिंदेंचा टोला.