पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुरुंचा आशीर्वीद घेवून विराट – अनुष्का करणार ‘हे’ काम

विराट कोहली - अनुष्का शर्मा यांच्या गुरुंचा आशीर्वाद घेण्यासाठी पोहोचले 'या' ठिकाणी; यापूर्वी अनेक सेलिब्रिटी आणि राजकारणातल्या व्यक्तींनी घेतले मोदी यांच्या गुरुंचे आशीर्वाद...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुरुंचा आशीर्वीद घेवून विराट - अनुष्का करणार 'हे' काम
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुरुंचा आशीर्वीद घेवून विराट - अनुष्का करणार 'हे' काम
Follow us
| Updated on: Jan 31, 2023 | 8:13 AM

मुंबई : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मा (anushka sharma) आणि क्रिकेटर विराट कोहली (virat kohali) पुन्हा एकदा अध्यात्म करताना दिसले आहेत. विराट – अनुष्का सोमवारी ऋषिकेश याठिकाणी पोहोचले आणि शिशमझाडी येथे असणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांचे गुरु स्वामी दयानंद सरस्वती यांच्या आश्रमात गेले. याठिकाणी दोघांनी गुरु स्वामी दयानंद सरस्वती यांचे आशीर्वाद घेतले. महत्त्वाचं म्हणजे यावेळी विराटची आई सरोज कोहली देखील विराटसोबत आहे. कोहली कुटुंब आज ऋषिकेश याठिकाणी मु्क्काम करणार आहे. (pm narendra modi guru)

काही दिवसांपूर्वी देखील विराट, अनुष्का लेकीसोबत देवदर्शनासाठी गेले होते. श्रीलंका विरुद्ध वनडे सीरिजपूर्वी विराट – अनुष्का वृंदावन याठिकाणी गेले होते. त्याआधी दोघे नैनीताल येथे असणाऱ्या एका मंदिरात देखील गेले होते. दरम्यान दोघांचे फोटो देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. (guru swami dayanand saraswati)

आता आई सरोज कोहली यांच्यासोबत विराट आणि अनुष्का यांनी ब्रह्मलीन दयानंद सरस्वती यांच्या समाधीचं दर्शन केलं. यावेळी विराटने समाधी स्थळावर २० मिनिटं ध्यान देखील केलं. स्वामी दयानंद सरस्वती यांच्या आश्रमात यापूर्वी सुपरस्टार रजनीकांत यांच्यासह अनेक सेलिब्रिटी आणि राजकारणी व्यक्ती दर्शनासाठी गेल्या आहेत.

विराट कोहली – अनुष्का शर्मा

२०१५ मध्ये जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आश्रमात आले होते, त्यानंतर अनेक जण स्वामी दयानंद सरस्वती यांच्या आश्रमात आशीर्वीद घेण्यासाठी पोहोचले. आता विराट आणि अनुष्का स्वामी दयानंद सरस्वती यांच्या आश्रमात दर्शन घेण्यासाठी गेल्यामुळे सर्वत्र आश्रमाची पुन्हा चर्चा होत आहे.

आश्रमात दर्शन घेतल्यानंतर विराट – अनुष्का गंगा नदीकाठी पोहोचले. त्याठिकाणी त्यांनी संत आणि पंडितांसोबत गंगेची आरती केली आणि आशीर्वाद घेतले. तर संध्याकाळी विराटने कुटुंबासोबत भोजन केलं. मिळालेल्या माहितीनुसार कोहली कुटुंब मंगळवारी देखील ऋषिकेशमध्ये राहणार आहे. (virat kohli and anushka sharma love story)

मंगळावरी कोहली कुटुंब हवन-यज्ञामध्ये सहभागी राहणार असून त्यांच्याकडून भंडाऱ्याचं आयोजन करण्यात येणार आहे आणि प्रसाद देखील वाटण्यात येणार आहे. सध्या सर्वत्र विराट आणि अनुष्का यांची चर्चा रंगत आहे. (virat kohli and anushka sharma)

भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात...
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात....