नोकरचाकर असूनही मुलांसाठी विराट-अनुष्का आवर्जून करतात हे काम

अभिनेत्री अनुष्का शर्मा लंडनहून भारतात परतली असून मुंबईतल्या एका कार्यक्रमाला तिने हजेरी लावली होती. या कार्यक्रमात अनुष्का तिच्या मुलांविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. कोट्यवधींचे मालक आणि घरात नोकरचाकरांची रेलचेल असूनही मुलांसाठी ते कोणतं काम आवर्जून करतात, याविषयी तिने सांगितलंय.

नोकरचाकर असूनही मुलांसाठी विराट-अनुष्का आवर्जून करतात हे काम
Virat Kohli and Anushka SharmaImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Sep 05, 2024 | 11:33 AM

अभिनेत्री अनुष्का शर्मा नुकतीच भारतात परतली असून सोशल मीडियावर तिचे फोटो आणि व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहेत. मुंबईतील एका कार्यक्रमात अनुष्काने हजेरी लावली होती. या कार्यक्रमात ती तिच्या मुलांविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. “विराट आणि मी आमच्या आणि मुलांच्या रुटीनबद्दल खूप शिस्तबद्ध आहोत. जगाच्या पाठीवर आम्ही कुठेही असलो तरी जेवणाच्या आणि झोपणाच्या वेळा काटेकोरपणे पाळतो”, असं तिने म्हटलंय. विराट आणि अनुष्का हे कोट्यवधींचे मालक आहेत. त्यांच्या घरात नोकराचाकरांची सतत रेलचेल असते. तरीही आपल्या मुलांसाठी विराट आणि अनुष्का आवर्जून एक काम करतात. हे काम कोणतं आहे, याचाही खुलासा अनुष्काने या कार्यक्रमात केला.

अनुष्का म्हणाली, “आम्ही घरीसुद्धा याबद्दल चर्चा करतो की जर आमच्या आईने आमच्यासाठी जे जेवण बनवलं, ते आम्ही मुलांसाठी नाही बनवलं तर पुढच्या पिढीकडे ती गोष्ट कशी पोहोचणार? त्यामुळे कधीकधी मी जेवण बनवते आणि कधी माझा पती मुलांसाठी जेवण बनवतो. आमच्या आईने ज्या पद्धतीने आमच्यासाठी जेवण बनवलं होतं, आम्ही तसंच आमच्या मुलांसाठी बनवण्याचा प्रयत्न करतो. कधीकधी मी आईला फोन करून रेसिपी विचारून चिटींगसुद्धा करते. पण असं करणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही तुमच्या मुलांपर्यंत अत्यंत मौल्यवान काहीतरी पोहोचवताय, असा त्याचा अर्थ होतो.”

हे सुद्धा वाचा

मुलांच्या रुटीनविषयी बोलताना अनुष्का पुढे म्हणाली, “मी रुटीनबद्दल खूप शिस्तबद्ध आहे. आम्ही कुटुंब म्हणून खूप ट्रॅव्हल करतो आणि त्यामुळे माझ्या मुलांना त्यांच्या आयुष्यात बऱ्याच बदलांना सामोरं जावं लागतं. त्यांच्यासाठी एक रुटीन तयार करून एका अर्थाने मी त्यांना नियंत्रित करतेय. आमच्या जेवणाची वेळ ठरलेली आहे. जगाच्या पाठीवर आम्ही कुठेही असलो तरी आम्ही त्या ठरलेल्या वेळेतच जेवतो आणि झोपतो. त्यामुळे स्वत:चं नियमन करणं त्यांच्यासाठी सोपं जातं”

अनुष्का नुकतीच लंडनहून मुंबईत परतली आणि मुंबईत आल्या आल्या ती एका कार्यक्रमाला उपस्थित राहिली. बऱ्याच काळानंतर मीडिया आणि चाहत्यांसमोर आल्याने मला खूप चांगलं वाटतंय, अशी भावना तिने यावेळी व्यक्त केली. अनुष्काने इन्स्टाग्रामवर काही फोटोसुद्धा पोस्ट केले आहेत.

भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.