विराट कोहली – अनुष्का शर्मा कायमचे लंडनला होणार शिफ्ट? ‘या’ 4 कारणांमुळे दाट शक्यता
Virat Kohli and Anushka Sharma: लोकप्रिय क्रिकेटर विराट कोहली आणि प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मा भारत सोडून कायमचे होणार लंडनला शिफ्ट? 'या' 4 कारणांमुळे वर्तवण्यात येत आहे दाट शक्यता, सध्या सर्वत्र दोघांच्या खासगी आयुष्याची चर्चा...
अभिनेत्री अनुष्का शर्मा हिने जेव्हा दुसऱ्या बाळाला लंडन याठिकाणी जन्म दिला आहे, तेव्हा पासून अनुष्का शर्मा आणि विराट कोहली लंडन येथे शिफ्ट होणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. विराट कोहली वर्ल्ड कप फायनल जिंकल्यानंतर भारतात आला. सेलिब्रेशन केल्यानंतर विराट थेट लंडनला पत्नी अनुष्का आणि मुले वामिका आणि अकाय यांना भेटण्यासाठी गेला. अशात विराट – अनुष्का पुन्हा लंडन याठिकाणी शिफ्ट होणार असल्याची चर्चांनी जोर धरला आहे. यामागे 4 महत्त्वाची कारणं देखील आहेत.
मुलगा अकाय याचा जन्म : अनुष्का शर्मा हिने दुसरा मुलगा अकाय याला लंडन येथे जन्म दिला आहे. दुसऱ्या मुलाच्या जन्माच्या आधीपासून विराट – अनुष्का लंडनमध्ये आहेत. मुलांना झगमगत्या विश्वापासून दूर ठेवण्यासाठी विराट – अनुष्का लंडनमध्ये शिफ्ट होतील असं सांगण्यात येत आहे. दोघांनी भारतात मुलांसाठी ‘नो फोटो पॉलिसी’ देखील कायम ठेवली आहे.
View this post on Instagram
भारतात विराट – अनुष्का यांना नाही मिळत प्रायव्हसी : पापाराझी कल्चर भारतभर सर्वत्र पसरलं आहे. सोलिब्रिटींची एक झलक कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी पापाराझी गर्दी करतात. अनेकदा विराट – अनुष्का शॉपिंग करताना, हॉटेलमध्ये जेवताना देखील स्पॉट करण्यात आलं आहे. म्हणून परदेशात असल्यामुळे त्याच्या खासगी आयुष्याच्या चर्चा रंगत नाहीत. शिवाय मुलांसोबत त्यांना फिरता देखील येतं.
View this post on Instagram
विराट कोहलीला सामान्य आयुष्य जगायला आवडतं : एका मुलाखतीत खुद्दा विराटने सांगितलं होतं की, जेव्हा आम्ही देशाबाहेर असतो, तेव्हा पूर्णपणे सामान्य आयुष्य जगतो. माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी हा फार अप्रतिम अनुभव असतो. एखाद्या सामान्य व्यक्तीप्रमाणे रस्त्यावर चालणं आणि ओळखलं जाऊ न देणं हा एक चांगला अनुभव आहे. असं विराट म्हणाला होता.
मुलांच्या भविष्यासाठी होतील लंडनला शिफ्ट : प्रसिद्धी झोतापासून दूर आणि साधं आयुष्य जगायला विराट आणि अनुष्का यांना आवडतं. त्यांच्या मुलांचे फोटो काढलेलं देखील त्यांना आवडत नाही. विराट आणि अनुष्का यांच्या स्टारडमचा परिणाम मुलांवर होऊ नये म्हणून दोघे मुलांना देखील सोशल मीडियापासून दूर ठेवतात. या चार करणांमुळे विराट आणि अनुष्का मुलांसोबत लंडनला शिफ्ट होऊ शकतात.