आई बनल्यानंतर प्रथमच घराबाहेर पडली अनुष्का, सोबत लेकही…
भारतीय क्रिकेट संघाचा (Indian Cricket Team) कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) या दोघांच्या घरी नन्ही ‘परी’चे आगमन झाले आहे
मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) या दोघांच्या घरी नन्ही ‘परी’चे आगमन झाले आहे. विराट आणि अनुष्काचं हे पहिलं बाळ आहे. आज मुंबईच्या वांद्रेमध्ये विराट आणि अनुष्काने मुलीला डॉक्टरकडे तपासणीसाठी घेऊन आले होते. अनुष्काने निळ्या रंगाचा शर्ट आणि जीन्स घातली होती आणि पांढऱ्या रंगाचा मास्क घातला होता. विराटने काळ्या रंगाचा शर्टसह पँट घातली होती. मात्र, यावेळी त्यांच्या मुलीची झलक बघायला मिळाली नाही. (Virat Kohli and Anushka Sharma with daughter today at Bandra, Mumbai)
अनुष्काने सांगितलं होते की, विराटने बाळाला सोशल मीडियापासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही याबाबत खूप विचार केला. आम्ही आमचं बाळ वाढताना लोकांना दाखवण्याची इच्छा नाही. आम्ही आमच्या मुलांना सोशल मीडियात अडकवू इच्छित नाही. पुढे जाऊन त्याचा निर्णय मुलं घेतील. आजकाल मोठ्यांनाच सोशल मीडिया हँडल करण्यात इतकी समस्या येते. हे थोडं कठीण असेल पण आम्ही हे फॉलो करु. असे अनुष्काने सांगितले होते. त्यामुळे आज देखील विराट आणि अनुष्काने त्यांच्या मुलीची झलक दाखवली नाही.
अनुष्का शर्माने ‘पीके’, ‘बँड बाजा बारात’, ‘सुलतान’ आणि ‘ऐ दिल है मुश्किल’ अशा चित्रपटांमध्ये आपल्या बहारदार अभिनयाने लोकांच्या हृदयात एक खास ओळख निर्माण केली आहे. याचबरोबर अनुष्का शर्मा ‘क्लीन स्लेट फिल्म्स’ या प्रॉडक्शन हाऊसची भागीदार देखील आहे. नुकतीच तिची निर्मिती असलेला ‘बुलबुल’ हा चित्रपट नेटफ्लिक्सवर, तर ‘पाताल-लोक’ ही वेब सीरीज ओटीटीवर प्रदर्शित झाली आहे. अनुष्का शर्मा 2018मध्ये शाहरूख खानसोबत ‘झिरो’ या चित्रपटात झळकली होती. यानंतर तिने सगळ्या कामांतून ब्रेक घेतला आहे.
संबंधित बातम्या :
Breaking News | मिर्झापूरचे दिग्दर्शक आणि OTT विरोधात सुप्रीम कोर्टाने काढली नोटीस, पाहा काय कारण!
भारतातल्या लॉकडाऊनवर येतोय चित्रपट, पाहिलं पोस्टर रिलीज!
संकटाला धावून येणाऱ्या सोनू सूदच्या नावाने ॲम्बुलन्स सेवा सुरु, अशा प्रकारे करणार लोकांची मदत
(Virat Kohli and Anushka Sharma with daughter today at Bandra, Mumbai)