बेंगळुरू : आयपीएलमुळे व्यग्र वेळापत्रक असतानाही क्रिकेटर विराट कोहलीने पत्नी अनुष्का शर्मासाठी आवर्जून वेळ काढला. हे दोघं बेंगळुरूमधील सीटीआर मल्लेश्वरम हॉटेलमध्ये दाक्षिणात्य खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी पोहोचले होते. मात्र यावेळी हॉटेलमधून बाहेर पडताना चाहत्यांनी मोठ्या संख्येने दोघांना घेतलं. काहींनी सेल्फी तर काहींनी ऑटोग्राफची मागणी केली. नंतर या जमावाला नियंत्रित करणं त्यांच्या बॉडीगार्डलाही कठीण केलं. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
आपल्या पुढील मॅचच्या आधी आरसीबीच्या टीमला एक दिवसाचा आराम मिळाला होता. म्हणूनच विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे बेंगळुरूमध्ये लंच डेटला निघाले. यावेळी दोघंही कॅज्युअल लूकमध्ये दिसले होते. हे दोघं जेव्हा रेस्टॉरंटमधून बाहेर पडले, तेव्हा तिथे लोकांनी मोठी गर्दी केली होती. ही गर्दी हळूहळू इतकी वाढली की सुरक्षारक्षकांनाही त्यांना नियंत्रित करता आलं नाही.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये स्पष्ट पहायला मिळत आहे की चाहत्यांनी विराट आणि अनुष्काला घेरलंय. त्यांची एक झलक पाहण्यासाठी किंवा सेल्फी क्लिक करण्यासाठी हे चाहते आतूर होते. अनुष्काला तिच्या गाडीपर्यंत पोहोचणंही कठीण झालं होतं. अशातच पाच ते सहा सुरक्षारक्षक मिळून गर्दीला बाजूला करतात आणि विराट – अनुष्काला त्यांच्या गाडीपर्यंत पोहोचण्यास मदत करतात.
.@imVkohli and @AnushkaSharma spotted this legendary #CTR Malleshwaram restaurant..crowd chants #RCB #RCB pic.twitter.com/tPCocgI1en
— A Sharadhaa (@sharadasrinidhi) April 22, 2023
अनुष्का शर्माने ‘झिरो’ या चित्रपटानंतर काही काळ ब्रेक केला. मध्यंतरीच्या काळात तिने निर्मिती क्षेत्रावर लक्ष केंद्रीत केलं. ‘पाताल लोक’, ‘बुलबुल’ यांसारख्या प्रोजेक्ट्सासाठी तिने काम केलं. गेल्या वर्षी ओटीटीवर प्रदर्शित झालेल्या ‘कला’ या चित्रपटात ती पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकली होती. आता ती लवकरच झूलन गोस्वामी यांच्या बायोपिकमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘चकदा एक्स्प्रेस’ असं या चित्रपटाचं नाव असून त्याची शूटिंग नुकतीच पूर्ण झाली आहे.
आयपीएल जेतेपद मिळवण्यासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघ गेल्या काही वर्षापासून मेहनत घेत आहे. मात्र दरवर्षी त्याच्या पदरी निराशाच पडत आहे. यंदाही आरसीबीनं मुंबई इंडियन्सला पराभूत करत चांगली सुरुवात केली. मात्र मधल्या सामन्यांमध्ये गाडी रुळावरून घसरली. त्यानंतर पंजाब किंग्स पराभूत करत पुन्हा एकदा संघाची गाडी रुळावर आली आहे. मागच्या सहा पैकी चार सामन्यात विराट कोहलीने जबरदस्त खेळी केली. मुंबई इंडियन्स, लखनऊ सुपर जायंट्स, दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स विरुद्ध त्याने अर्धशतकं झळकावली.