मुलाच्या जन्मानंतर लंडनमधील विराट कोहलीचा फोटो व्हायरल

अभिनेत्री अनुष्का शर्माने लंडनमध्ये दुसऱ्या बाळाला जन्म दिला आहे. विराट कोहली आणि अनुष्काने त्यांच्या मुलाचं नाव अकाय असं ठेवलं आहे. सोशल मीडियावर पोस्ट लिहित त्यांनी चाहत्यांनी ही आनंदाची बातमी सांगितली आहे. यानंतर विराटचा लंडनमधील फोटो व्हायरल होत आहे.

मुलाच्या जन्मानंतर लंडनमधील विराट कोहलीचा फोटो व्हायरल
विराट कोहली, अनुष्का शर्माImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Feb 21, 2024 | 12:03 PM

मुंबई : 21 फेब्रुवारी 2024 | क्रिकेटर विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी मंगळवारी सोशल मीडियावर पोस्ट लिहित चाहत्यांना आनंदाची बातमी सांगितली. विराट आणि अनुष्का दुसऱ्यांदा आई-वडील झाले आहेत. अनुष्काने 15 फेब्रुवारी रोजी लंडनमध्ये मुलाला जन्म दिला. मुलाच्या जन्माची गोड बातमी सांगतानाच विराट आणि अनुष्काने त्याचं नावंसुद्धा जाहीर केलं आहे. त्यांच्या या पोस्टवर कमेंट्स करत अनेकांनी दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव केला. यादरम्यान विराटचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लंडनमधील रस्त्यावर फिरतानाचा त्याचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

अनुष्काने तिच्या दुसऱ्या बाळाला लंडनमध्ये जन्म दिला आहे. आता विराटचा लंडनमधील एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विराट कोहलीच्या फॅन पेजवर हा फोटो पोस्ट करण्यात आला आहे. यामध्ये विराट लंडनच्या रस्त्यावर फिरताना दिसत आहे. त्याने जॅकेट आणि व्हाइट पँट परिधान केला आहे. कॅप आणि गॉगल लावलेल्या विराटच्या चेहऱ्यावर अत्यंत गंभीर भाव आहेत. अनुष्का आणि विराटने सोशल मीडियावर पोस्ट लिहित मुलाच्या जन्माची आनंदाची बातमी चाहत्यांना दिली. ‘आम्हाला हे सांगताना अत्यंत आनंद होतोय की 15 फेब्रुवारी रोजी आम्ही आमचा मुलगा अकाय आणि वामिकाच्या छोट्या भावाचं स्वागत केलं. आमच्या आयुष्यातील या अत्यंत सुंदर क्षणी आम्हाला केवळ तुमचा आशीर्वाद आणि शुभेच्छा हव्या आहेत’, अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या होत्या.

हे सुद्धा वाचा

पहा विराटचा फोटो

गेल्या वर्षापासून अनुष्काच्या प्रेग्नंसीची जोरदार चर्चा होती. मात्र त्यावर विराट आणि अनुष्काने मौन बाळगलं होतं. काही दिवसांपूर्वीच दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटर आणि विराटचा मित्र एबी डिविलियर्सने त्याच्या युट्यूब चॅनलवर मोठा खुलासा केला होता. विराट दुसऱ्यांदा पिता बनणार आहे आणि तो सध्या त्याच्या कुटुंबीयांसोबत वेळ व्यतीत करत आहे, असं म्हणत त्याने विराट आणि अनुष्का शर्माच्या चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. मात्र काही दिवसांपूर्वी अचानक एबी डिविलियर्सने त्याच्या या वक्तव्यापासून माघार घेतली होती. इतकंच नव्हे तर त्याने चाहत्यांची माफीसुद्धा मागितली होती. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे आणि मी विराटबद्दल जे बोललो, ते चुकीचं होतं, असं त्याने स्पष्ट केलं होतं.

बिझनेसमन हर्ष गोयंका यांनी एक्सवर (ट्विटर) यासंदर्भात एक पोस्ट लिहिली होती. ‘आता काही दिवसांतच एका बाळाचा जन्म होणार आहे. आता फक्त हे पहायचं आहे की तो बाळ वडिलांसारखा मोठा क्रिकेटर बनणार की आईसारखं चित्रपटांमध्ये करिअर करणार’, असं त्यांनी लिहिलं होतं. यासोबतच बाळाचा जन्म लंडनमध्ये होणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं.

लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.