Virat Kohli | ‘एवढंच बोललास, तर मला पण…’ अनुष्कासोबत असताना विराट कॅमेरामनला काय म्हणाला?

विराट कोहली सध्या आयपीएलमध्ये व्यग्र आहे तर अनुष्का शर्माने नुकतंच तिच्या आगामी चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलं. 2018 मध्ये ती शाहरुख खानसोबत 'झिरो' चित्रपटात झळकली होती. त्यानंतर तिने निर्मिती क्षेत्रावर लक्ष केंद्रीत केलं.

Virat Kohli | 'एवढंच बोललास, तर मला पण...' अनुष्कासोबत असताना विराट कॅमेरामनला काय म्हणाला?
Virat Kohli and Anushka SharmaImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: May 11, 2023 | 12:17 PM

मुंबई : विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे नुकतेच मुंबईत त्यांची टीम रॉयल चॅलेंजर्स बँगलोरसोबत डिनर करण्यासाठी निघाले होते. त्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये विराट पापाराझींसोबत मस्करी करताना दिसतोय. विराट आणि अनुष्काला पाहिल्यानंतर एका पापाराझीकडून छोटीशी चूक होते, मात्र त्याला विराट जे उत्तर देतो, ते ऐकून तुम्हालाही हसू अनावर होईल. या व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून भन्नाट प्रतिक्रिया येत आहेत. पापाराझींनी शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये विराट कोहलीने काळ्या रंगाची पँट, प्रिंटेड शर्ट आणि पांढऱ्या रंगाचे स्निकर्स घातले आहेत. तर अनुष्का शर्माने पांढऱ्या रंगाची पँट, त्याच रंगाचा स्ट्रिप्ड टॉप आणि काळ्या रंगाचे हिल्स घातले होते.

पापाराझींसाठी हे दोघं एकत्र उभे राहून पोझ देत असतात. त्याचवेळी एक फोटोग्राफर चुकून अनुष्काला ‘सर’ म्हणतो. यावर लगेच विराटची भन्नाट प्रतिक्रिया ऐकायला मिळते. पापाराझींला तो म्हणतो ‘आता विराट मॅमसुद्धा बोलून टाक’. हे ऐकल्यानंतर सर्व फोटोग्राफर्स हसू लागतात. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘विराटची विनोदबुद्धीही कमालीची आहे’, असं एकाने लिहिलं. तर दुसऱ्या युजरने ‘विराट मॅम, अनुष्का सर’ असं म्हटलंय.

हे सुद्धा वाचा

विराट कोहली सध्या आयपीएलमध्ये व्यग्र आहे तर अनुष्का शर्माने नुकतंच तिच्या आगामी चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलं. 2018 मध्ये ती शाहरुख खानसोबत ‘झिरो’ चित्रपटात झळकली होती. त्यानंतर तिने निर्मिती क्षेत्रावर लक्ष केंद्रीत केलं. 2020 मध्ये तिच्या निर्मिती संस्थेनं ‘पाताल लोक’ या सीरिजची आणि ‘बुलबुल’ या चित्रपटाची निर्मिती केली. गेल्या वर्षी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील ‘कला’ या चित्रपटात तिने पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती. ‘घोडे पे सवार’ या गाण्यात ती झळकली होती.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.