विराट कोहलीने चक्क एका प्रसिद्ध मराठमोळ्या गायकाला केलं इन्स्टाग्रामवर ब्लॉक, कारण…
विराट कोहलीने अलीकडेच एका प्रसिद्ध मराठी गायकाला सोशल मीडियावर ब्लॉक केले आहे. यामुळे चाहत्यांमध्ये कुतूहल निर्माण झाले आहे.. गायकाचा बॉलिवूडमध्येही तेवढाच चाहता वर्ग आहे. पण विराटने या गायकाला ब्लॉक केल्यानं त्यानं नाराजी व्यक्त केली आहे. त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
विराट कोहली त्याच्या हटके स्टाइलमुळे नेहमी प्रसिद्धी झोतात असतो. तो चाहत्यांसोबतही नेहमी नम्रपणेच वागताना दिसतो. फक्त विराटला त्याच्या खाजगी आयुष्याबद्दल नेहमी गुप्तता बाळगायला आवडते. त्याला त्याची स्पेप आवडते. पण त्यामुळे कोण दुखावलं जाईल असं कधीही तो वागला नाही. पण एका गायकाने मात्र त्याच्यावर नाराजी व्यक्त केली आहे.
या गायकाने विराटने त्याला इन्स्टाग्रामवर ब्लॉक केल्याचा दावा केला आहे. या गायकाने थेट पापाराझींजवळच त्याची नाराजी व्यक्त केली आहे. त्यातूनच त्याच्या गायकाच्या या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
विराटने ब्लॉक केल्याचा दावा
विराटने ब्लॉक केल्याचा दावा करणारा प्रसिद्ध गायक आहे राहुल वैद्य. राहुलने पापाराझींशी बोलताना विराटने इन्स्टाग्रामवर त्याला ब्लॉक केल्याचं सांगत त्याने नाराजी व्यक्त केली आहे. तो म्हणाला, “माहीत नाही का, पण मला विराट कोहलीने इन्स्टाग्रामवर ब्लॉक केलं आहे.
मला आजपर्यंत समजलं नाही की त्याने मला ब्लॉक का केलं. तो भारतातील सर्वात्तम फलंदाजांपैकी एक आहे. पण माहीत नाही मला का ब्लॉक केलं. कदाचित काहीतरी घडलं असेल”, असं म्हणत राहुल वैद्यनेही याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं आहे.
राहुलचा व्हिडीओ व्हायरल
राहुलचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या व्हिडीओवर नेटकरी विविध प्रकारच्या कमेंट्स दिल्या आहेत. काहींनी “विराट कोहली सध्या इन्स्टाग्रामवर फार पोस्ट करत नाही, त्यामुळे तू टेन्शन घेऊ नकोस” असं म्हणत त्याला धीर देण्याचा प्रयत्न केला आहे.
View this post on Instagram
तर काहींनी “विराट कोहली तुला ओळखत नसेल” असं म्हणत त्याची खिल्लीही उडवली आहे . फिल्मीज्ञान या पापाराझी अकाउंटवरून राहुलचा हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.
दरम्यान विराटने यावर अद्याप तरी काही प्रतिक्रिया दिलेली नाहीये. तसेच काहींच्या मते विराटचे सोशल मीडियावर करोडो फॅन आहेत त्यांपैकी तो फक्त राहुललाच का ब्लॉक करेल असे प्रश्नही विचारण्यात आले आहेत. जेव्हा विराट यावर काही प्रतिक्रिया देईल तेव्हाच याचं उत्तर मिळेल.
दिलजीत दोसांझ आणि एपी ढिल्लननंतर विराट अन् राहुलची चर्चा
दरम्यान विराट अन् राहुच्या आधी दिलजीत दोसांझ आणि एपी ढिल्लन यांचीही अशीच बातमी समोर आली होती. एपी ढिल्लनने दिलजीत दोसांझने ब्लॉक केल्याचा आरोप केल्यानंतर सोशल मीडियावर या दोघांबद्दल जोरदार चर्चा झालीय.
तर दुसरीकडे एपी ढिल्लनने थेट स्क्रीनशॉट शेअर करत ब्लॉक केल्याचं खरं आहे असं सांगीतलं. तर या दोघांच्या वादावर रॅपर बादशाहने अप्रत्यक्ष प्रतिक्रिया देत. त्याने व हनी सिंगने जी चूक केली ती या दोघांनीही करू नये, अशी विनंती त्याने पोस्टमध्ये केली आहे.
मात्र या दोघांनतंर आता राहुल वैद्यने विराट कोहलीने त्याला ब्लॉक केल्याचा दावा खरा आहे का आणि खरा असेल तर असं विराटने का केलं असेल यावर प्रश्न नक्कीच उपस्थित होत आहेत.