Virat Kohli | विराट कोहली इन्स्टाग्रामवरील एका पोस्टमधून कमावतो तब्बल इतके कोटी रुपये

या यादीत समाविष्ट असणारी आणखी एक भारतीय सेलिब्रिटी म्हणजे 'देसी गर्ल' प्रियांका चोप्रा. 8 कोटी 83 लाख 38 हजार 623 फॉलोअर्ससह ती या यादीत 29 व्या स्थानी आहे. प्रियांका एका पोस्टसाठी 4.40 कोटी रुपये घेते.

Virat Kohli | विराट कोहली इन्स्टाग्रामवरील एका पोस्टमधून कमावतो तब्बल इतके कोटी रुपये
Virat Kohli and Anushka SharmaImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Aug 12, 2023 | 10:51 AM

मुंबई | 12 ऑगस्ट 2023 : भारतीयांसाठी क्रिकेट म्हणजे जणू धर्मच आहे आणि क्रिकेटर्सना इथे सेलिब्रिटींइतकंच महत्त्व दिलं जातं. चाहत्यांमध्ये या क्रिकेटर्सची तुफान क्रेझ पहायला मिळते. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीचे जगभरात चाहते आहेत. सोशल मीडियावरही त्याची फॅन फॉलोइंग थक्क करणारी आहे. त्याने एक फोटो किंवा व्हिडीओ पोस्ट करताच त्यावर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत असतो. म्हणूनच विराट हा इन्स्टाग्रावरील सर्वाधिक श्रीमंत अॅथलीट्समध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीत टॉप 25 मध्ये विराट हा एकमेव भारतीय आहे. इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या एका फोटोसाठी तो तब्बल 11.45 कोटी रुपये कमावतो.

इन्स्टाग्रामवर विराटचे तब्बल 25 कोटी 52 लाख 69 हजार 526 फॉलोअर्स आहेत. इन्स्टाग्रामद्वारे सर्वात कमाई करणाऱ्या सेलिब्रिटींमध्ये पहिल्या स्थानावर ख्रिस्तियानो रोनाल्डो आहे. त्याचे तब्बल 59 कोटी 68 लाख 48 हजार 846 फॉलोअर्स आहेत. एका पोस्टसाठी तो 26.76 कोटी रुपये घेतो. तर मेस्सी दुसऱ्या क्रमांकावर असून तो एका पोस्टसाठी 21.49 कोटी रुपये घेतो.

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Virat Kohli (@virat.kohli)

या यादीत समाविष्ट असणारी आणखी एक भारतीय सेलिब्रिटी म्हणजे ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा. 8 कोटी 83 लाख 38 हजार 623 फॉलोअर्ससह ती या यादीत 29 व्या स्थानी आहे. प्रियांका एका पोस्टसाठी 4.40 कोटी रुपये घेते. गायिका दुआ लिपासुद्धा एका पोस्टसाठी जवळपास इतकंच मानधन घेते. भारतीय इन्फ्लुएन्सर रियाज अली या यादीत 77 व्या स्थानी आहे. अलीचे इन्स्टाग्रामवर 2 कोटी 79 लाख 69 हजार 911 फॉलोअर्स आहेत. एका पोस्टसाठी तो जवळपास 94 हजार रुपये घेतो.

2023 च्या इन्स्टाग्रामवरील सर्वांत श्रीमंत सेलिब्रिटींच्या या यादीत सेलिना गोमेज, कायली जेनर, डायने जॉन्सन, एरियाना ग्रांडे, किम कर्दाशियन, बियॉन्से, ख्लो कर्दाशियन, जस्टीन बिबर, केंडल जेनर, टेलर स्विफ्ट, जेनिफर लोपेज, निकी मिनाज, कोर्टनी कर्दाशियन, मायली सायरल, केटी पेरी, नेमार ज्युनियर, केविन हार्ट, कार्डी बी, डेमी लोवाटो, रिहाना, बिली एलिश आणि कायलियन एमबाप्पे यांचा समावेश आहे.

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.