Instagram | विराट, प्रियांका, श्रद्धा.. ‘इन्स्टाग्राम’वरील एका पोस्टसाठी तब्बल इतके रुपये घेतात सेलिब्रिटी

फक्त सेलिब्रिटीच नाही तर इन्फ्लुएन्सर्सनाही इन्स्टाग्रामवरून बराच पैसा कमावता येतो. फॉलोअर्सच्या आकड्यावरून आणि लोकप्रियतेवरून ठराविक ब्रँड संबंधित इन्फ्लुएन्सरशी संपर्क साधतात. त्या ब्रँडच्या पोस्टसाठी, रिलसाठी किंवा स्टोरीसाठी त्यांना ठराविक रक्कम मानधन म्हणून दिली जाते.

Instagram | विराट, प्रियांका, श्रद्धा.. 'इन्स्टाग्राम'वरील एका पोस्टसाठी तब्बल इतके रुपये घेतात सेलिब्रिटी
Virat, Priyanka and ShraddhaImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: May 30, 2023 | 2:00 PM

मुंबई : फोटो आणि रिल्स पोस्ट करण्यासाठी सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकजण ‘इन्स्टाग्राम’ या ॲपचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात. सेलिब्रिटी या ॲपवर त्यांचे विविध फोटो चाहत्यांसाठी शेअर करतात, असं जर तुम्हाला वाटत असेल तर खरं कारण त्यापेक्षा वेगळंच आहे. सेलिब्रिटी आणि इन्फ्लुएन्सर यांना ठराविक पोस्टसाठी चांगली रक्कम मिळते. सोशल मीडियावरील फोटो किंवा व्हिडीओसाठी त्यांना चांगलंच मानधन मिळतं. इन्स्टा स्टोरीसाठी कमी तर त्यापेक्षा जास्त पैसे पोस्टसाठी मिळतात. जर स्टोरीसोबत ब्रँड पेजची लिंक असेल तर त्यासाठी आणखी पैसे दिले जातात. पोस्टसोबतही ब्रँडची लिंक असेल तरी त्याला जास्त फी आकारली जाते. यामध्ये सर्वांत महागडी गोष्ट म्हणजे जेव्हा एखादा सेलिब्रिटी ब्रँडच्या पेजसोबत कोलॅब करतो.

भारतीय सेलिब्रिटी इन्स्टाग्रामवरील एका पोस्टसाठी किती मानधन घेतात ते जाणून घेऊयात..

विराट कोहली– 3.5 ते 5 कोटी रुपये (25 कोटी फॉलोअर्स)

हे सुद्धा वाचा

प्रियांका चोप्रा जोनास– 2 कोटी रुपये (जवळपास 8.77 कोटी फॉलोअर्स)

श्रद्धा कपूर– दीड कोटी रुपये (जवळपास 8.08 कोटी फॉलोअर्स)

आलिया भट्ट– दीड ते 2 कोटी रुपये (जवळपास 7.74 कोटी फॉलोअर्स)

दीपिका पदुकोण– 2 कोटी रुपये (जवळपास 7.41 कोटी फॉलोअर्स )

कतरिना कैफ– 1 कोटी रुपये (जवळपास 7.28 कोटी फॉलोअर्स)

View this post on Instagram

A post shared by Virat Kohli (@virat.kohli)

वर्षभरात हे सेलिब्रिटी जवळपास त्यांच्या कमाईच्या 20-30 टक्के भाग सोशल मीडियावरून कमावतात. त्यामुळे सोशल मीडिया हा सेलिब्रिटींसाठी किती महत्त्वाचा आहे, हे या आकड्यांवरून स्पष्ट होत आहे. फक्त इन्स्टाग्रामच नाही तर ट्विटर, फेसबुक या साइट्सवरही पोस्ट करण्यासाठी त्यांना ब्रँडकडून पैसे दिले जातात. ब्रँडचं महत्त्व आणि शूटिंगसाठी लागणारा वेळ यावरून सेलिब्रिटी मानधनाची रक्कम ठरवतात.

फक्त सेलिब्रिटीच नाही तर इन्फ्लुएन्सर्सनाही इन्स्टाग्रामवरून बराच पैसा कमावता येतो. फॉलोअर्सच्या आकड्यावरून आणि लोकप्रियतेवरून ठराविक ब्रँड संबंधित इन्फ्लुएन्सरशी संपर्क साधतात. त्या ब्रँडच्या पोस्टसाठी, रिलसाठी किंवा स्टोरीसाठी त्यांना ठराविक रक्कम मानधन म्हणून दिली जाते. म्हणूनच गेल्या काही वर्षांत सोशल मीडियावर इन्फ्लुएन्सर्सचं महत्त्व खूप वाढलं आहे. हल्ली बॉलिवूड सेलिब्रिटीसुद्धा या इन्फ्लुएन्सर्ससोबत प्रमोशनचे व्हिडीओ करताना दिसतात. अधिकाधिक चाहत्यांपर्यंत पोहोचण्याचा हा सर्वांत सोपा मार्ग असल्याचं समजलं जातंय.

Non Stop LIVE Update
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.