Virat Kohli | अनुष्काच्या प्रेग्नंसीच्या चर्चांदरम्यान विराट कोहली घाईत मुंबईत परतला; काय आहे कारण?

विराट आणि अनु्ष्का दुसऱ्यांदा आई – बाबा होणार असल्याच्या चर्चा सध्या सर्वत्र तुफान रंगत आहेत. रिपोर्टनुसार, अनुष्का शर्मा दुसऱ्यांदा गरोदर आहे. विराट आणि अनुष्का लवकरच चाहत्यांसोबत ‘गुडन्यूज’ शेअर करणार असल्याची माहिती देखील समोर येत आहे.

Virat Kohli | अनुष्काच्या प्रेग्नंसीच्या चर्चांदरम्यान विराट कोहली घाईत मुंबईत परतला; काय आहे कारण?
Anushka Sharma and Virat KohliImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Oct 02, 2023 | 12:55 PM

मुंबई | 2 ऑक्टोबर 2023 : अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटर विराट कोहली हे दुसऱ्यांदा आई-बाबा बनणार असल्याची जोरदार चर्चा आहे. मात्र याबद्दल दोघंही अद्याप मौन बाळगून आहेत. अनुष्का प्रेग्नंसीच्या दुसऱ्या तिमाहीत असल्याचं कळतंय. गरोदरपणाच्या अखेरच्या टप्प्यात ते याबद्दल जाहीर करतील, असंही म्हटलं जात आहे. या चर्चांदरम्यान आता विराट कोहली अचानक मुंबईला परतला आहे. वर्ल्ड कप 2023 साठी गुवाहाटीमध्ये वॉर्म-अप मॅचमध्ये व्यग्र असलेल्या विराटला तातडीने मुंबईला यावं लागलं आहे. पर्सनल इमर्जन्सीचं कारण देत तो परतल्याचं कळतंय.

पत्नी अनुष्काला भेटण्यासाठी विराट गुवाहाटीहून मुंबईसाठी इमर्जन्सी फ्लाइटने आला. त्यामुळे अनेक चर्चांना उधाण आलं आहे. विराट मंगळवारी तिरुवनंतपुरममध्ये नेदरलँडविरोधातील टीम इंडियाच्या आयसीसी वनडे क्रिकेट वर्ल्ड कपच्या दुसऱ्या प्रॅक्टिसमध्ये व्यग्र होता. यादरम्यान तो अचानक मुंबईला परतला असून त्यामागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही.

हे सुद्धा वाचा

विराट आणि अनुष्काने 11 डिसेंबर 2017 रोजी लग्नगाठ बांधली. इटलीत मोजकेच कुटुंबीय आणि मित्रमैत्रिणींच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा पार पडला. तर 11 जानेवारी 2021 रोजी अनुष्काने वामिकाला जन्म दिला. या दोघांनी मुलीला माध्यमांपासून दूरच ठेवणं पसंत केलंय. आता दुसऱ्या प्रेग्नंसीच्या चर्चांदरम्यान अनुष्काचा एक व्हिडीओ पापाराझींनी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये ती तिच्या कारमध्ये पॅसेंजर सीटवर बसली असून पापाराझींना व्हिडीओ किंवा फोटो क्लिक करू नका, यासाठी हातवारे करताना दिसतेय.

गेल्या काही दिवसांपासून अनुष्काने कोणत्याच कार्यक्रमाला हजेरी लावली होती. ती जाणूनबुजून माध्यमांपासून आणि पापाराझींपासून दूर राहतेय, असं म्हटलं जात आहे. इतकंच नव्हे तर ती विराटसोबत कोणत्याच सामन्याला हजेरी लावत नव्हती. विराट आणि अनुष्का यांना नुकतंच मॅटर्निटी क्लिनिकबाहेरही पाहिलं गेलं होतं. त्यावेळी त्यांनी पापाराझींना फोटो क्लिक न करण्याची विनंती केली होती. या सर्व गोष्टींमुळे अनुष्काच्या प्रेग्नंसीच्या चर्चांना उधाण आलं आहे.

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.