मॅच जिंकताच विराटचा अनुष्काला व्हिडीओ कॉल; मुलांना दिले फ्लाइंग किस

सोमवारी पंजाब किंग्सविरुद्धचा सामना जिंकल्यानंतर विराट कोहलीने मैदानावरूनच पत्नी अनुष्का शर्माला व्हिडीओ कॉल केला. हा क्षण कॅमेरात टिपला गेला. मुलगी वामिका आणि मुलगा अकाय यांच्याशीही तो व्हिडीओ कॉलवर बोलताना दिसला.

मॅच जिंकताच विराटचा अनुष्काला व्हिडीओ कॉल; मुलांना दिले फ्लाइंग किस
Virat KohliImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Mar 26, 2024 | 11:26 AM

‘फॅमिली मॅन’ हा शब्द क्रिकेटर विराट कोहलीसाठी परफेक्ट आहे. कारण क्रिकेटच्या मैदानावर असो, स्टेडियम कुठेही असो किंवा सोशल मीडियावर असो.. विराट नेहमीच त्याच्या पत्नी आणि मुलांची विशेष काळजी घेताना दिसतो. सोमवारी विराटने केवळ सामनाच नाही तर असंख्य चाहत्यांची मनंसुद्धा जिंकली. बेंगळुरूमधील एम. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये सामना जिंकल्यानंतर विराटने त्याची पत्नी अनुष्का शर्माला व्हिडीओ कॉल केला. पत्नी अनुष्का, मुलगी वामिका आणि मुलगा अकाय यांना पाहण्यासाठी, त्यांच्याशी बोलण्यासाठी त्याने मैदानावरूनच व्हिडीओ कॉल केला. हे खास क्षण कॅमेरात टिपले गेले आहेत.

सोमवारी बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर पंजाब किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा सामना पार पडला. या सामन्यात विराटने 49 चेंडूत 77 धावा केल्या होत्या. मॅच संपल्यानंतर विराटने लगेच त्याच्या पत्नीला व्हिडीओ कॉल केला. व्हिडीओ कॉलवर बोलताना तो फ्लाइंग किस देताना आणि पुन्हा टीमकडे जायचंय असा इशारा करताना दिसला. त्याचे हे खास क्षण कॅमेरात टिपण्यात आले आहेत. हे दृश्य जेव्हा स्क्रीनवर पहायला मिळालं तेव्हा कॉमेंटेटरसुद्धा म्हणाला, “जबाबदाऱ्या कधीच संपत नाहीत आणि जेव्हा तुम्ही इतकं शानदार खेळता तेव्हा कुटुंबीयांसोबत बोलणं आणखी खास ठरतं.”

हे सुद्धा वाचा

पहा व्हिडीओ-

सोशल मीडियावर विराटचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये तो व्हिडीओ कॉलवर बोलताना मनमोकळा हसताना, मधेच चेहरा लपवताना आणि चिडवताना दिसून येत आहे. मुलगी वामिका किंवा मुलगा अकायशी तो गंमत करत असावा, असा अंदाज त्यावरून लावला जाऊ शकतो. विराटचं हे दृश्य पाहून नवज्योत सिंग सिद्धू म्हणाले, “मॅच संपली आणि वडिलांची ड्युटी सुरू झाली. विराट हा डॅडी कूल आहे. मला असं वाटतंय की तो त्याच्या छोटूला पाहून खूप खुश होत आहे.”

विराटचा ‘फॅमिली मॅन’ अंदाज पाहून चाहतेसुद्धा खूप खुश झाले. या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय. ‘विराट हा म्हणूनच किंग कोहली म्हणून ओळखला जातो’, असं एकाने लिहिलं. तर ‘मी हा व्हिडीओ दिवसभर बघू शकते’, असं दुसऱ्या युजरने म्हटलंय. अनुष्काने 15 फेब्रुवारी रोजी मुलगा अकायला जन्म दिला. विराट आणि अनुष्काने 11 डिसेंबर 2017 रोजी इटलीत लग्नगाठ बांधली.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.